Published On : Tue, Jun 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘थाळी बजाओ’ आंदोलन; महागाईविरोधात सरकारला इशारा

Advertisement

नागपूर : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने नागपुरातील संविधान चौकात ‘थाळी बजाओ’ आंदोलन करण्यात आले. गॅस सिलिंडर हातात घेऊन आणि थाळ्या वाजवत कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महिला शहराध्यक्षा प्रिया फुके यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींचा निषेध करण्यात आला. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर मोठा परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

Gold Rate
Aug 3 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पैठे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

संविधान चौकात थाळ्या वाजवत कार्यकर्त्यांनी महागाईच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सरकारने तातडीने इंधन दर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Advertisement

यावेळी बोलताना दुनेश्वर पैठे यांनी इशारा दिला की, महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात ‘चक्का जाम’ आंदोलन छेडले जाईल.

या आंदोलनात शैलेंद्र तिवारी, महेंद्र भणगे, एस. बी. अहमद, वर्षा शामकुळे, देवेंद्र घरडे, मोरेश्वर जाधव, विजय येंडे, नंदकिशोर मते, शरद साहू, गोपाल ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Advertisement
"पहले भगवान को जोड़े हाथ... फिर उड़ाया चांदी का मुकुट और मंदिर की घंटी!  #NagpurNews #TempleTheft

"पहले भगवान को जोड़े हाथ... फिर उड़ाया चांदी का मुकुट और मंदिर...

पंकजा मुंडे भाजपा छोड़ें; वडेट्टीवार की अपील #vidarbhanews  #nagpur #newsupdate #vidarbha

पंकजा मुंडे भाजपा छोड़ें; वडेट्टीवार की अपील #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

Nagpur: नाबालिग छात्रा से दुष्कर्म का आरोप #nagpurnews #Crime #POCSO  #LatestNews #CityNews #Justice

Nagpur: नाबालिग छात्रा से दुष्कर्म का आरोप #nagpurnews #Crime #POCSO #LatestNews #CityNews...

शादी का झांसा देकर युवती से दुष्कर्म #Nagpur #NagpurNews #CrimeNews #NagpurPolice #NewsUpdate

शादी का झांसा देकर युवती से दुष्कर्म #Nagpur #NagpurNews #CrimeNews #NagpurPolice #NewsUpdate

नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात 'दारू पार्टी'; शहर चालवणाऱ्या कार्यालयात नेमकं चाललं तरी काय?

नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात 'दारू पार्टी'; शहर चालवणाऱ्या कार्यालयात नेमकं चाललं तरी काय?

मिलावटी खाद्य पदार्थों पर सख्त कार्रवाई जारी #vidarbhanews #amravati #newsupdate  #nagpurnews

मिलावटी खाद्य पदार्थों पर सख्त कार्रवाई जारी #vidarbhanews #amravati #newsupdate #nagpurnews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges