Published On : Thu, Aug 29th, 2019

राष्ट्रवादीचा उद्या मुंबईत भव्य मोर्चा

मुलींवरील वाढत्या बलात्काराच्या घटनेचा निषेध म्हणून ;खासदार सुप्रियाताई सुळे नेतृत्व करणार.

मुंबई: जालना जिल्हयातील १९ वर्षीय मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ३० ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ११ वाजता चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात राहणाऱ्या एका १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबुर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामूहिक बलात्कार केला होता.

या पीडितेची महिनाभर मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज काल रात्री अखेर संपली आहे. या घटनेला एक महिना उलटल्यानंतरही अद्याप आरोपींना
अटक झालेली नाही. या घटनेच्या निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी मुंबई विभागीय अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली चेंबुर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस ठाणे असा हा भव्य मोर्चा काढला जाणार आहे.