Advertisement
मुंबई: भंडारा-गोंदियामध्ये भाजपचा पराभव करत दणदणीत विजय मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत विजयोत्सव साजरा केला.
भंडारा-गोंदिया पोटनिवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुकर कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा पराभव करत दणदणीत मतांनी विजय प्राप्त केला. पक्षाचे मधुकर कुकडे यांच्या विजयाचा आनंद प्रदेश कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत आणि नाचून साजरा करण्यात आला.
यावेळी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार अशोक धात्रक, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो , संजय तटकरे, महेश तपासे, मुंबई विभागीय सहसचिव भालचंद्र शिरोळे, कुलाबाचे सामाजिक न्यायविभागाचे अध्यक्ष जयेश वाणी, कार्यालयीन सचिव राजेश गांगण, प्रभाकर येऊल यांच्यासह असंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.