Published On : Thu, May 31st, 2018

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना

pandurang fundkar

नागपूर: भाजपमधील ज्येष्ठ नेते राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाची वार्ता ऐकून धक्काच बसला. पक्षात विविध पदे भूषविणारे, पक्षाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे, कृषी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार म्हणून भाऊसाहेबांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या सर्व क्षेत्रातील आमचा मार्गदर्शक आणि पक्षाचा ज्येष्ठ आधारस्तंभ आम्ही गमावला, याचे तीव्र दु:ख आहे. भाऊसाहेबांना नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली.

जनसंग्रह असलेला नेता हरपला – दीपराज पार्डीकर, कार्यकारी महापौर
राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची राजकारणावर चांगली पकड होती. कृषी क्षेत्र, सहकार क्षेत्रात त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्यांचा जनसंग्रह मोठा होता. आमदार, विरोधी पक्ष नेते, खासदार, प्रदेशाध्यक्ष, कृषिमंत्री अशा विविध पदावर त्यांनी आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या निधनाने पक्षात ज्येष्ठ मार्गदर्शकाची पोकळी निर्माण झाली आहे. पक्षासाठी त्यांनी दिलेले समर्पण हे सदैव लक्षात राहील. भाऊसाहेबांना विनम्र आदरांजली.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement