Published On : Thu, May 31st, 2018

कार्यकारी महापौरांसह सभापतींनी केली गोरेवाडा पाणीपुरवठा केंद्राची पाहणी

Advertisement

Gorewada water supply inspection by Dy Mayor

नागपूर: संभाव्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी गोरेवाडा येथील जलशुद्धीकरण आणि पाणीपुरवठा केंद्राची पाहणी केली.

यावेळी मंगळवारी झोनच्या सभापती संगीता गिऱ्हे, नगरसेवक व नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे,उपअभियंता दीपक चिटणीस उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी सर्वप्रथम गोरेवाडा तलावाची पाहणी केली. या तलावात पेंचमधून येणाऱ्या पाण्याबद्दल माहिती घेतली. याच परिसरात नवीन पाणी टाकीचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्याबद्दलही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि सभापती पिंटू झलके यांनी घेतली.

Gold Rate
Tuesday 25 March 2025
Gold 24 KT 87,900 /-
Gold 22 KT 81,700 /-
Silver / Kg 98,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर पेंच टप्पा एक प्रकल्प कार्यालयाला भेट दिली. यावेळी पेंचमधून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण कशा प्रकारे होते, संपूर्ण शहराला पाणीपुरवठा कशाप्रकारे होते, त्याचे कंट्रोलिंग कसे आहे, याबाबत प्लान्ट मॅनेजर डॉ. दिलीप ठाकरे आणि ओसीडब्ल्यूचे प्रवीण सरण यांनी माहिती दिली. नागपूर शहराला पाणीपुरवठा करताना कन्हान मधून किती दाबाने पाणी येते, प्रत्येक टाकीमध्ये किती दाबाने पाणी जाते, कुठे लिकेज झाले तर त्याची माहिती कंट्रोल रूमला कशाप्रकारे होते, याबाबत सर्व मान्यवरांना माहिती देण्यात आली.

Gorewada water supply inspection by Dy Mayor

नागपुरात जर पाणी टंचाईचे संकट आले तर अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था काय, ती कशाप्रकारे राबविण्यात येते याबाबत कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी आसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement