Published On : Mon, Nov 12th, 2018

रा.का.पा.: दीवाळी स्नेह मिलन “समारोह संपन्न

नागपुर : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाव्दारे पक्ष कार्यालय गणेशपेठ येथे संध्याकाळी ६.०० वाजता “दिवाळी स्नेह मिलन*” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख उपस्थिती मा.अनिलजी अहिरकर शहर अध्यक्ष व मा.शब्बीर विद्रोही राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्यक विभाग,मा.प्रविण कुंटे पाटील प्रदेश प्रवक्ता, गंगाप्रसाद ग्वालबंशी प्रदेश महासचिव, प्रकाश गजबीये आमदार, ईश्वर बाळबुडे ओ.बी.सी प्रदेश अध्यक्ष, दिलीप पनकुळे प्रदेश सचिव, जाणबाजी मस्के प्रदेश सेवादल कार्याध्यक्ष, धनराजजी फुसे, प्रदेश महासचिव, अल्का कांबळे महिला अध्यक्ष. यांची होती.

दिप प्रज्वलन करुन मान्यवरांनी सर्वांना शुभेच्छा संदेश व्यक्त करतांना सांगीतले की भारतात सर्व धर्मीय लोक हा सण आनंदात साजरा करतात. “दिवाळी” हा रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप , हा मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या व सर्व बंधु,भगिनिच्या जीवनात प्रकाश निर्माण होऊन यश प्राप्ती व्हावी म्हणून हा दीपोत्सव साजरा करावा.

एकात्मतेचा संदेश देणा-या या आनंदमय दिवाळी स्नेह मिलन “समारोहात सुंदर रेशमी वस्त्र,कलात्मक विविध रंगाचे वस्त्र परिधान करुन रा.का.पा.पदाधिकारी व

कार्यकर्ते यांनी एकमेकांना मंगलमयी शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा केला.

या प्रसंगी देवीदास घोडे, विशाल खांडेकर, शैलेश पांडे, अशोक काटले, रविंद्र इटकेलवार, मिलिंद मानापुरे, प्यारुद्दीन काजी, नूतन रेवतकर, सुरेखा अहिरकर, मीना कुंटे, राजू नागुळवर. ज्वाला धोटे, चरणजीत सिंह चौधरी, सुनील लांजेवर, अरविंद ढेंगरे, हेमंत भोतमांगे, महेंद्र भांगे, विलास मालके अशोक अडीकणे, उर्वशी गिरडकर, आकाश चिमनकर आदी कार्यक्रमात सहभागी झाले होते.