मुंबई : राज्यातील आगामी राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाने निवडणूक रणनीती अधिक मजबूत करण्यासाठी प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत चर्चा केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
सोमवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत आगामी निवडणुकांची तयारी, पक्षाची संघटनात्मक बांधणी, प्रचाराची दिशा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या नव्या पद्धतींवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असून, जून महिन्यापासून प्रशांत किशोर प्रत्यक्ष निवडणूक रणनीतीत सक्रिय होऊ शकतात. विशेषतः सोशल मीडिया प्रचार, बूथ पातळीवरील संघटन मजबूत करणे, युवा मतदारांपर्यंत पोहोच आणि जनसंपर्क मोहिमांवर भर दिला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





