Published On : Thu, May 28th, 2020

अडचणी असल्यास विलगीकरण केंद्र प्रमुखांना संपर्क करा! – महापौर संदीप जोशी यांचे आवाहन

नागपूर : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना विलगीकरण केंद्रात पाठविण्यात येते. तेथे नागपूर महानगरपालिकेतर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांची व्यवस्था बघण्यासाठी प्रत्येक विलगीकरण केंद्रावर इंसिडंट कमांडर आणि सहायक इंसिडंट कमांडरची नेमणूक करण्यात आली आहे.

विलगीकरण केंद्रात प्रत्येक व्यक्तीला उत्कृष्ट व्यवस्था देणे यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध असून कुठलीही अव्यवस्था होत आहे, असे वाटत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

नागपुरात प्रोझोन बिल्डर्स रेसिडेन्शियल स्कीम चिचभवन, व्ही.एन.आय.टी. अंबाझरी, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, पाचपावली, वसंतराव नाईक छात्रावास, धरमपेठ, राजनगर पोलिस वसाहत, छत्तरपूर फार्म हाऊस, सिम्बॉयसिस कौशल्य विकास विद्यापीठ, भांडेवाडी, राधास्वामी सत्संग ब्यास, कळमेश्वर रोड, लॉ कॉलेज होस्टल, आमदार निवास, सिव्हील लाईन्स, रविभवन, सिव्हील लाईन्स हे ११ विलगीकरण केंद्र आहेत. त्यातील क्षमतेनुसार आणि जागा उपलब्धतेनुसार नागरिकांना संबंधित ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात येते.

येथील इंसिडंड कमांडर आणि सहायक इंसिडंट कमांडरचे मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रोझोन बिल्डर्स रेसिडेन्शियल स्कीम येथील इंसिडंट कमांडकर उपअभियंता राधेश्याम निमजे (९९२३४२५८९९), उपअभियंता आनंद मोखडे (८८८८८१२०२२), व्हीएनआयटी अंबाझरी येथील इंसिडंट कमांडर उपविभागीय अभियंता ए.पी. गोटे (९४२२१०३८४८), पाचपावली पोलिस क्वार्टर येथील इंसिडंट कमांडर सहायक अभियंता एन.टी. बाराहाते (९४२२१६६०५२), वसंतराव नाईक छात्रावास धरमपेठ येथील इंसिडंट कमांडर उपविभागीय अधिकारी सुहास अल्लेवार (९४२३४१९३४६), राजनगर पोलिस वसाहत येथील इंसिडंट कमांडर सहायक अभियंता रेहान खान (८६९८२९४७०७), छत्तरपूर फार्म येथील इंसिडंट कमांडर उपविभागीय अभियंता व्ही.जी. नाईक (९४२१८०६०७३), सिम्बॉयसीस कौशल्य विकास विद्यापीठ येथील इंसिडंट कमांडर उपअभियंता उज्ज्वल धनविजय (९१४५४४२९७३), राधास्वामी सत्संग ब्यास, कळमेश्वर रोड येथील इंसिडंट कमांडर अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी (९९७००५७६४७), लॉ कॉलेज होस्टल, लॉ कॉलेज चौक येथील इंसिडंट कमांडर उपअभियंता श्रीकांत देशपांडे (९९२३३८५६३३), आमदार निवास येथील इंसिडंट कमांडर उपविभागीय अभियंता एल.पी. राऊडकर (९४२३४०२९७०), रविभवन, सिव्हील लाईन्स नागपूर येथील इंसिडंट कमांडर उपअभियंता चंद्रशेखर गिरी (९७३००२३८८) असा आहे.

विलगीकरणात पाठविलेल्या नागरिकांना संबंधित ठिकाणी भोजन, रहिवास तथा अन्य व्यवस्थेत कुठल्याही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित केंद्राच्या जबाबदार अधिकाऱ्याच्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.