मुंबई : बुंद से गयी वो हौदसे नही आती… भाजप उघडं पडल्यानंतर ते झाकण्यासाठी बोलत आहेत. ४० हजार कोटी रुपये आल्यानंतर परत पाठवणे शक्य नाही आणि जर पाठवले असतील तर पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागेल आणि राजीनामा द्यावाच लागेल असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अनंत हेगडे यांनी ४० हजार कोटी रुपये परत पाठवण्यासाठी ८० तासासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आले असे वक्तव्य केले. या वक्तव्यावर नवाब मलिक यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे.
हा महाराष्ट्रावर अन्याय नाही तर देशातील राज्यांवर अन्याय आहे. ही आग देशभर पसरेल. बंगाल, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यातील जनता राज्यावर होणारा अन्याय सहन करणार नाही असेही नवाब मलिक म्हणाले.