Published On : Mon, Aug 5th, 2019

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक…

Nawab Malik

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले नियुक्तीचे आदेश…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज नवाब मलिक यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.