# ८० % नागपूरचा पाणीपुरवठा आज (२३ जून ला) झाला बाधित
# उद्या २४ जून ला सकाळचा पाणीपुरवठा बाधित राहण्याची शक्यता
नागपूर: महापारेषण (MSETCL) यांनी मनसर सब-स्टेशन वरून येणाऱ्या ३३KV मुख्य विद्युत वाहिनीवर मोठा बिघाड वाचविण्यासाठी तसेच काही देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी आज दुपारी २.३० वाजता इमर्जन्सी पॉवर शटडाऊन घेतले .
ह्या इमर्जन्सी पॉवर शटडाऊन मुळे नागपूर महानगरपालिकेच्या नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन चा वीजप्रवाह अचानक खंडित झाला आणि जलशुद्धीकरण केंद्रावरून गोरेवाडा येथील पेंच-१, पेंच-२ आणि पेंच ३ तसेच गोधनी स्थित पेंच-४ ह्या जलशुद्धीकरण केंद्रातून कच्च्या पाण्याचे पम्पिंग खंडित झाले आहे.
आपल्या माहितीकरिता नागपूर महानगर पालिकेच्या नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन वरून नागपूर शहरातील गोरेवाडा स्थित पेंच-१, पेंच २, पेंच-३ जलशुद्धीकरण केंद्र आणि गोरेवाडा तलाव तसेच गोधणी स्थित पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र येथे कच्च्या पाण्याचा (raw water ) चा पुरवठा शुद्धीकरण करण्याकरिता केल्या जातो .
नुकतेच २१ जून (बुधवारी) ला रात्री १२.१५ ते सकाळी ८.३० पर्यंत ला नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन चा विद्युत पुरवठा खंडित झाला होता आणि त्यामुळे जवळपास ८० नागपूरला पाणीपुरवस्थेचा फटका पडला होता .
आज अचानक झालेल्या इमर्जन्सी पॉवर शटडाऊन मुळे नागपूर शहरातील गोरेवाडा स्थित पेंच-१, पेंच २, पेंच-३ जलशुद्धीकरण केंद्र आणि गोधणी स्थित पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र वरून पाणीपुरवठा होणाऱ्या जवळपास ८० टक्के नागपूरचा आज (दि. २३ जून २०२३) चा सायंकाळचा आणि रात्रीचा पाणीपुरवठा बाधित झाला …तसेच उद्या दि. २४ जून (शनिवार ) चा सकाळचा पाणीपुरवठा बाधित राहण्याची शक्यता आहे . हे वृत्त लिहिस्तोवर महापारेषण चे तांत्रिक काम झाले नव्हते आणि नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन येथील विज पुरवठा पूर्ववत झालेला नव्हता …
आज (दि. २३ जून २०२३) तसेच उद्या दि. २४ जून (शनिवार ) चा सकाळचा पाणीपुरवठा बाधित राहणारे जलकुंभ* :
पेंच -१ जलशुद्धीकरण केंद्र : मेडिकल फीडर (गांधीबाग झोन ), बर्डी फीडर (धरमपेठ झोन), छावणी जलवाहिनी, राजभवन जलवाहिनी, इटारसी जलवाहिनी , सदर फीडर आणि गोरेवाडा जलकुंभ (मंगळवारी झोन) बोरियापुरा फीडर लाईन (सतरंजीपुरा झोन), वंजारी नगर ओल्ड लाईन , वंजारी नगर नव लाईन, हनुमान नगर आणि रेशीमबाग पाणीपुरवठा भाग
पेंच २ आणि ३ जलशुद्धीकरण केंद्र:लक्ष्मी नगर झोन ( गायत्री नगर जलकुंभ, प्रताप नगर जलकुंभ, खटला जलकुंभ, लक्ष्मी नगर जुने जलकुंभ, टाकली सिम जलकुंभ, जैताला जलकुंभ, त्रिमूर्ती नगर जलकुंभ , धरमपेठ झोन ( राम नगर जलकुंभ, सेमिनरी हिल्स नवीन जलकुंभ, सेमिनरी हिल्स जुने जलकुंभ , सिविल लाईन DT , दंभ जलकुंभ, टेकडी वाडी जलकुंभ, रायफल लाईन, फुटला लाईन, , हनुमान नगर झोन (चिंचभवन जलकुंभ , ) मंगळवारी झोन (गिट्टीखदान जलकुंभ ), गांधीबाग झोन (बोरियापुर/खदान जलकुंभ, किल्ला महाल जलकुंभ आणि सीताबर्डी फोर्ट १ आणि फोर्ट २ जलकुंभ)
गोधनी पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र : नारा जलकुंभ, नारी/ जरीपटका जलकुंभ (आशी नगर झोन),धंतोली जलकुंभ (धरमपेठ झोन) लक्ष्मी नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर १ आणि २ जलकुंभ म्हाळगी नगर जलकुंभ (हनुमान नगर झोन), हुडकेश्वर आणि नरसाळा ग्रामीण चा पाणीपुरवठा , सक्करदरा १, २ आणि ३ जलकुंभ (नेहरू नगर झोन)
नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे सहकार्य करावे…