Published On : Sun, Aug 9th, 2020

नवेगाव खैरीं तोतलाडोह धरणातुन होणार वीसर्ग

Advertisement

नदी नाल्यांच्या काठावरील लोकांना दीला सावधानतेचा इशारा,आज पासुन केव्हाही उघडणार दोन्ही धरणाचे दारे

रामटेक – नवेगाव खैरी सह तोतलाडोह धरणातील पाणी अनुक्रमे 92 टक्के व 90 टक्के भरल्याने आज पासुन केव्हाही धरणाची दारे उघडले जाऊ शकतात व पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यामुळे नदी नाल्याच्या काठावरील लोकांनी मासेमारी व शेतकऱ्यांनी सावध रहावे असे आवाहन प्रशासन मार्फत पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड यांनी केले आहे

पेंच प्रकल्पाअंतर्गत नवेगाव खैरी धरण 92 टक्के भरलेले असून तोतलाडोह धरण 90 टक्के भरले ला आहे सध्या पेंच नदी पाणलोट क्षेत्रात अति वृष्टी होत असल्याने तोतलाडोह जलसाठ्यात तसेच नवेगाव खैरी धरणाच्या जलसाठ्यात दररोज कमालीची वाढ होत असल्याने धरण पातळीत होणारी लक्षणीय वाढ पाहता आज पासुन केव्हाही दोन्ही धरणाची दारे उघडण्याची गरज भासू शकते या स्थितीत पेंच नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढू शकतो, त्यामुळे नवेगाव खैरी धरणाचे खालील गावांना मासेमारी करणाऱ्यांना वहिवाटदार यांसाठीही धोक्याची बाब असल्याचे पेंच पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता राजेश धोटे यांनी सांगितले.

सुरक्षेच्या दृष्टीने
नदी व धरनाच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहान तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले.