Published On : Mon, Jun 15th, 2020

मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क, नागपुरच्या ग्रंथालय विभागाद्वारे राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

नागपुर– कोविड -19 च्या लाँकडाऊन काळात प्राध्यापकांसाठी वर्क फ्रॉम होम सुविधा प्राप्त व्हावी आणि संशोधनाला चालना मिळावी या उद्देशातूनमातृसेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क, नागपुर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी आणि यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय, तळोधी बाळापुर तसेच बॅरि.शेषराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले. सर्व प्राध्यापक कोविड-19 च्या काळात घराबाहेर निघणे धोक्याचे असल्यामुळे वर्क फ्रॉम होम या संकल्पनेतून वेबिनारला चालना मिळतआहे. अशा परिस्थिती मध्ये प्राध्यापकांना नवनवीन ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळते. याच उद्देशातून राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले. “स्मार्ट टूल्स फाँर इनहान्सिंग द रिसर्च स्किल्स” ह्या मुख्य विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये डॉ. मार्गम मधुसूधन, सहयोगी प्राध्यापक,ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग, दिल्ली विद्यापीठ यांनी ‘रेफरन्सिंग इन रिसर्च अॅड वेब बेस्ड सायटेशन टूल्स’ या विषयावर प्रात्यक्षिकाद्वारे सर्व सहभागी प्राध्यापकांना सहज सोप्या भाषेमध्ये रिसर्च करतांना त्यामध्ये संदर्भ कसे व कोणत्या पद्धतीने द्यावे हे समजावून सांगितले. तसेच या वेबिनार चे दुसरे वक्ता डॉ. मितेशकुमार पंड्या संशोधक-सी (एल एस), इन्फ्लीबनेट सेंटर, गांधिनगर, गुजरात यांनी ‘अकॅडमिक डीसहोनेस्टी अॅड युज ऑफ अँटी प्ल्यगिअरिज़म टूल्स फोर अव्हायडिंग प्ल्यगिअरिज़म’ यात संशोधनासाठी उपयुक्त अशा उरकुंड साँफ्टवेअर द्वारे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून माहिती दिली.

या वेबिनारचे प्रास्ताविक मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क, नागपुर च्या प्राचार्या डॉ. ज्योती निसवाडे यांनी केले, त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून वेबिनारची रूपरेषा स्पष्ट केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी चे प्राचार्य डॉ. अजिझउलहक यांनी संशोधनासाठी व संशोधकाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हा वेबिनार निश्चितच उपयुक्त ठरेल असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले. यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. अरुणप्रकाश यांनी आपल्या वक्तव्या मध्ये राष्ट्रीय वेबिनार हे जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणून कमीत कमी वेळात आणि खर्चात ज्ञान देणारे उपयुक्त साधन असून हे वेबिनार संशोधनाला चालना देणारे आहे असे मत व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. एम. व्ही. कोल्हे, बॅरि.शेषराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा यांनी आपल्या वक्तव्यात वेबिनारचा उद्देश स्पष्ट केला, तसेच या वेबिनारची उपयोगिता किती व कोणती याविषयी सविस्तर सांगितले.

वरील चारही महाविद्यालयाच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने या वेबिनार चे आयोजन करण्यात आले. डॉ. प्रिन्स अजयकुमार आगाशे, ग्रंथपाल, मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क, नागपुर यांनी संचालन केले. डॉ.धनंजय देवते, ग्रंथपाल, बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. उमेश हरडे, ग्रंथपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांनी सहभागी प्राध्यापकांनी ऑनलाईन सुचविलेले प्रश्न वक्त्यांना विचारण्यासाठी प्रतिनिधित्व केले तसेच तांत्रिक बाबी हाताळण्याचे कार्य केले.

दोन्ही वक्त्यांनी समर्पक उत्तरे देऊन सहभागी प्राध्यापकांचे समाधान केले. शेवटच्या टप्यात यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय, तळोधी बाळापुर चे ग्रंथपाल श्री. मोहन रतकंठीवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सर्वांच्या अथक प्रयत्नाने हा वेबिनार यशस्वी झाला. या वेबिनारची प्रसिद्धी टेलिग्राम आणि व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आली. याकरिता भारतातील विविध राज्यातील 3903 प्राध्यापकांनी नोंदणी केली. जास्तीत जास्त प्राध्यापकानी या ऑनलाईन वेबीनारचा झूम, युटूब आणि फेसबुक च्या माध्यमातून लाभ घेतला. सर्व सहभागी प्राध्यापकांना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.