Published On : Mon, Feb 10th, 2025
By Nagpur Today Nagpur News

राष्ट्रीय नमुना पाहणीत आरोग्यावर झालेल्या खर्चाचे होणार सर्वेक्षण सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

Advertisement

नागपूर, : भारत सरकारच्या आधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून कुटुंबाचा आरोग्यविषयक खर्च या विषयावर राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येत असलेल्या पाहणीत अर्थ या सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण घेण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाकरीता निवड झालेल्या कुटुंबांमध्ये मागील ३६५ दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यावर झालेल्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येणार आहे.

नमूना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील एकूण लोकसंख्येसाठी अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरीता घरी येणा-या अधिकारी व कर्मचारी यांना या सर्वेक्षणाकरीता कुटुंबांची यादी तयार करणे व निवडलेल्या कुटुंबांकडून आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती उपलब्ध देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबीयांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Gold Rate
10 May 2025
Gold 24 KT 94,700/-
Gold 22 KT 88,100/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही पाहणी होणार असून या पाहणीचा मुख्य उद्देश शासकीय आणि खाजगी रुग्णालय व दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्यावर होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणा अंतर्गत कुटुंबाची निवड एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असलेले कुटुंब आणि मागील ३६५ दिवसांमध्ये रुग्णालयांमध्ये दाखल असलेली कुटुंबातील व्यक्ती यामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा करणे आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय व राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.

या अनुषंगाने माहिती संकलित करणा-या अधिकारी व कर्मचारी यांना सखोल प्रशिक्षण देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे दि. ७ जानेवारी ते १० जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती गोळा करतील.

Advertisement
Advertisement