Published On : Mon, Feb 10th, 2025
By Nagpur Today Nagpur News

आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ; गैरप्रकार आढळल्यास तक्रार करण्याचे आवाहन

Advertisement

नागपूर : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधीन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. गैरप्रकार आढळल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारची प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गैरप्रकार निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रशासन अधिकारी मनपा, नपा, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे (depmh२@gmail.com), आयुक्त (शिक्षण), पुणे (educommoffice@gmail.com) यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी.असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement