नागपूर – प्रत्येक कार्यालय, दुकान, आस्थापना व कारखान्यात ज्यामध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कामगार आहेत अशा प्रत्येक नियोक्त्याने आपल्या आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. ही समिती स्थापन करून कामगार विभागास अहवाल सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या समितीची अध्यक्षा कार्यालयातील, आस्थापनेतील वरिष्ठ महिला अधिकारी असावी. परंतु वरिष्ठ महिला अधिकारी, कर्मचारी उपलब्ध नसेल तर इतर कार्यालय, प्रशासकीस विभाग जी विविध ठिकाणी म्हणजे विभाग किंवा उपविभाग स्तरावर कार्यरत आहेत अशा कार्यालयातील उच्चपदस्थ महिला अधिकारी यांची अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करता येईल. तसेच कामाच्या ठिकाणी असणाऱ्या इतर कार्यालयात किंवा प्रशासकीय विभागात सुध्दा वरिष्ठ स्तरावरील महिला अधिकारी, कर्मचारी उपलब्ध होत नसेल तर त्याच नियोक्त्याच्या अन्य कोणत्याही कामाच्या ठिकाणाहुन किंवा इतर विभागातुन किवा खाजगीक्षेत्रात इतरसंघटनेतील अध्यक्ष पदस्थ महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करता येईल.
या समितीमध्ये, प्राधान्याने महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव आहे किंवा ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे अशा कर्मचाऱ्यांमधुन किमान दोन सदस्य नियुक्त करावेत.महिलांच्या प्रश्नांशी बांधिल असलेल्या अशासकीय संघटना किंवा संघ किंवा लैगिक छळाशी संबंधित प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती. यामधील एक सदस्य असावा. परंतु, अशा रीतीने नामनिर्देशित करावयाच्या एकुण सदस्या पैकी किमान ५० टक्के सदस्य महिला असाव्यात. अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष आणि प्रत्येक सदस्य यांची कार्यालय प्रमुखाकडून, नियोक्त्यांकडून नियुक्ती करण्यात येईल व त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून तीन वर्षांहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी ते पद धारण करतील.
जर एखाद्या मालकाने कलम अंतर्गत तक्रार समिती स्थापन केले नसल्यास कायद्यातील व नियमातील विविध तरतुदीचे व जाबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला ५० हजार रुपयापर्यंत दंड होईल, अशी तरतुद आहे.
जिल्हयातील सर्व दुकान, आस्थापना व कारखाने धारकांकडे १० किंवा जास्त कर्मचारी, कामगार कामावर आहेत त्यांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करुन तसा अहवाल अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासीय इमारत क्र. २. ४ था माळा, ए विंग, जिल्हा परिषद जवळ, सिव्हिल लाईन, नागपूर ४४०००१ येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन १०ईमेल adcingp@gmail.com अथवा दुरध्वनी क्रमांक ०७१२-२९८०२७३, २९८०२७५) येथे संपर्क साधावा.