Published On : Fri, Aug 9th, 2019

शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी चे निषेध मोर्चा

वेगळा विदर्भाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन

कामठी : सत्ताधारी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांचे हाल बेहाल होत असून आर्थिक अडचणीत अडकले आहेत .’एक राष्ट्र एक संविधान ‘ही बाब भारत देशामध्ये लागू आहे परंतु येथील विद्दूत विभागाच्या चुकीच्या व मनमानी कारभारामुळे भेदभाव पूर्ण वातावरणात सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असून यामध्ये एक राष्ट्र एक संविधान चा प्रकार दिसून येत नसल्याने सत्ताधारी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राजेश काकडे तसेच तेजस बहुउद्देशोय संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुल्लेवार यांच्या नेतृत्वात कामठी तहसील कार्यालय वर निषेध मोर्चा काढण्यात आले.

यामध्ये दिल्लीतील केजरीवाल सरकार नागरिकांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज देत आहे , 200 ते 400 युनिट विद्दूत ही सुद्धा सबसिडीवर देत आहे तेव्हा हाच नियम महाराष्ट्रात लागू करावा व महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील जनतेला 200 युनिट पर्यंत कोणतेही शुल्क न घेता मोफत वीजपुरवठा करावा, इलेक्ट्रिक बिल थकबाकी असलेल्या जनतेचे संपूर्ण बिल माफ करण्यात यावे , शेतकऱ्यांना शेतीसाठी मोटरपम्प उपलब्ध करून देत मोफत वीजपुरवठा करण्यात यावा, विदर्भातील विद्दूत प्रोजेकट मधील नोकरीवर स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या देण्यात याव्या, शेतकऱ्यांचे कर्जमाफी केल्याचा गाजावाजा करण्यात आला परंतु सातबाराआ कोरा झालाच नाही तेव्हा सातबारा कोरा करा व कर्ज पूर्ण माफ करा तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबियास नोकरी द्या, शेतकरी बांधवाच्या मुलांना मोफत शिक्षन द्या, शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी प्रति एकर 20 हजार रुपये अनुदान राशी द्या, एका जिल्हा परिषद सर्कल मध्ये कृषिवर आधारित प्रक्रिया संस्था निर्माण करा, व शेतकऱ्यांना रोजगार द्या, विदर्भातील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा, बेरोजगार युवकांना बेरोजगारी भत्ता प्रति महिना 6 हजार रुपये देऊन रोजगार उपलब्ध करून द्या,55 वर्षावरील शेतकऱ्यांनाआ 6 हजार रुपये मासिक पेन्शन लागू करा तसेच रेल्वे व बस सेवा निशुल्क प्रवास पासेस उपलब्ध करून द्या तसेच मोफत आरोग्य सेवा द्या, कामठी शहरातील युवकांसाठी एमपीएससी, यूपीएससी ची वाचनालये निर्माण करा तसेच खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्या व पोलीस भर्ती व सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण संस्था निर्माण करा अशा विविध मागण्यांची घोषणाबाजी करीत मागण्यांच्या पुर्तेसाठी तहसीलदार मार्फत सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

हा मोर्चा जयस्तंभ चौकातून काढत मुख्य मार्गाने भ्रमण करीत तहसिल कार्यालयात पोहोचले व तहसीलदार ला सामूहिक निवेदन सादर करीत या निषेध मोर्च्यांचे सांगता करण्यात आली.यावेळी राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश काकडे, राष्ट्रीय महासचिव चंद्रभान रामटेके, राष्ट्रीय उपाध्यक्ष नंदकिशोर रामटेके,, जैनउल्लाह शाह, शंकर बर्मन, अजय शर्मा, प्रवीण उराडे, प्रीती डँबारे, सचिन भागवत, रवींद्र खडसे, वसंता काकडे , अभिमन करडभाजने, प्रभाकर काळे, गणेश करडभाजने, कामठी तालुकाध्यक्ष श्रीकांत ठाकरे, कामठी विधानसभा अध्यक्ष अर्जुन राऊत, रोशन शाहू, शिवप्रसाद राऊत, संजय आंबटकर तसेच तेजस बहुउउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुल्लेवार व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते गण प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी