Published On : Thu, Jan 17th, 2019

भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते 19 जानेवारीला उद्‌घाटन

नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी 2019 रोजी मुंबईत भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्‌घाटन करणार आहेत. या अद्ययावत संग्रहालयासाठी 140.61 कोटी रुपये खर्च आला आहे. दृक-श्राव्य, ग्राफिक्स, प्रदर्शन आणि मल्टी मिडियाच्या माध्यमातून भारतीय सिनेमाचा 100 हून अधिक वर्षांचा प्रवास कथाकथनाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.

शाम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील संग्रहालय सल्लागार समितीने या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. या संग्रहालयाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नाविन्यपूर्ण संशोधन समिती स्थापन करण्यात आली होती.

Advertisement

हे संग्रहालय दोन इमारतींमध्ये तयार करण्यात आले आहे. मुंबईतील फिल्म्स डिव्हिजन परिसरातील 19 व्या शतकातील ऐतिहासिक गुलशन महल आणि नवीन इमारतीत हे संग्रहालय आहे.

Advertisement

नवीन इमारतीमध्ये चार प्रदर्शन हॉल आहेत. यामध्ये

1. गांधी आणि सिनेमा : यामध्ये महात्मा गांधीच्या जीवनावरील चित्रपटच नव्हे तर भारतीय चित्रपटांवरील त्यांच्या जीवनाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे.

2. बाल चित्रपट स्टुडिओ : यामध्ये संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना विशेषत: मुलांना चित्रपट निर्मितीमागील विज्ञान, तंत्रज्ञान आणि कला यांचा शोध घेण्याची संधी मिळणार आहे तसेच कॅमेरा, लाईट, शुटींग, अभिनय यासारख्या चित्रपटांशी संबंधित विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव संवादाच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. येथे क्रोमा स्टुडिओ, इमर्सिव्ह एक्सपिरियन्स झोन, स्टॉप-मोशन, ॲनिमेशन स्टुडिओ, व्हर्च्युअल मेकओवर स्टुडिओ यांचा समावेश आहे.

3.तंत्रज्ञान, सृजनशीलता आणि भारतीय चित्रपट : रुपेरी पडद्यावर छायाचित्रणाचा परिणाम दाखवण्यासाठी भारतीय चित्रपट दिग्दर्शकांनी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर या ठिकाणी पाहायला मिळतो.

4.संपूर्ण देशाभरातील चित्रपट : देशभरातील छायाचित्रण संस्कृतीच्या बदलणाऱ्या स्वरुपाचे दर्शन येथे घडते.

गुलशन महाल ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण श्रेणी-2 मधील वारसा इमारत असून भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालय प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित करण्यात आली आहे. या ठिकाणी मांडण्यात आलेल्या चित्रांमधून भारतीय सिनेमाचा शंभर वर्षांचा प्रवासाचे दर्शन घडते. याचे द ओरिजिन ऑफ सिनेमा, सिनेमा कम्स टू इंडिया, इंडियन सायलंट फिल्म, ॲडव्हेन्ट ऑफ साउंड, द स्टुडिओ एरा, द इम्पॅक्ट ऑफ वर्ल्ड वॉर टू, क्रिएटिव्ह रिझोनन्स, न्यू वेव्ह आणि बियाँड आणि रिजनल सिनेमा या नऊ विभागात विभाजन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement