Published On : Mon, Feb 5th, 2018

नॅशनल फायर सर्व्हीस गेम – 2018 चे समापन


नागपूर: नागपूर शहरात प्रथमच दि. 02.02.2018 ते 04.02.2018 पर्यंत नॅशनल फायर सर्व्हीस गेमचे आयोजन करण्यात आले हे राष्ट्रीय अग्निशमन सेवा व राष्ट्रीय अग्निशमन सेवा खेल स्पर्धा संयुक्तरित्या घेण्यात आल्या. हया स्पर्धा मानकापूर, स्पोर्टीग कॉम्प्लेक्स व प्रतापनगर ग्राऊंड येथे घेण्यात आल्या यात भारतातील 27 राज्यामधून अग्निशमन सेवेचे 1250 खेडाळू नागपूरात आले होते.

या स्पर्धेत धावने, उंच उडी, हर्डल फुट बॉल, हॉलीबॉल, बॅडमिन्टन व अग्निशमन संबंधात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेकरीता मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंन्द्र उचके, यांच्या नेतृत्वात अग्निशमन विभागाचे सुनिल एस. राऊत, सहा. स्थानाधिकारी यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर महानगरपालिका अग्निशमन विभागाचे 21 कर्मचारी स्पर्धेमध्ये सहभागी झाले. या स्पर्धेत पहिला क्रमांक दिल्ली फायर सर्व्हीस, दुसरा क्रमांक बंगलोर विमानतळ, ‍तिसरा क्रमांक नागपूर महानगरपालिका अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागातील कर्मचारी 1. सुरेश बी. आत्राम, प्रमुख अग्निशमन विमोचक 2. सुदाम डी. जाधव, अग्निशमन विमोचक 3. राजू डी. पवार, प्रमुख् अग्निशमन विमोचक 4. प्रमोद मांडवे, चालक यंत्रचालक यांनी भाग घेतला


स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाल्याबाबत मा. महापौर यांच्या कक्षात तसेच मा.आयुक्त अश्वीन मुदगल, मा.अपर आयुक्त रवींन्द्र कुंभारे यांनीसुध्दा उपरोक्त कर्मचा-यांचा सत्कार केला. अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत रॅलीच नागपूर शहरात हर्षनी कान्हेकर यांच्या चमूसह त्यांचे अभिनंदन करण्यात आले. व उपरोक्त 4 कर्मचारी यांचे तुळसीचे रोप देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने तसेच अग्निशमन सेवा समितीचे अध्यक्ष, मा. संजयकुमार बालपांडे, सदस्य राजकुमार शाहू, नगरसेवक ममता सहारे नगरसेविका सदस्य हरीश ग्वालवंसी तसेच मा. उपायुक्त्‍ राजेश मोहिते, सिव्हील स्थानकाचे केंद्र अधिकारी आर.आर. दुबे, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे के.आर. कोठे, कार्य. सहा. स्थानाधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
Advertisement