Published On : Thu, Jun 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर देशात शोककळा; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं तीव्र दु:ख

Advertisement

अहमदाबाद– गुजरातमधील अहमदाबाद शहरात गुरुवारी दुपारी घडलेल्या विमान अपघातामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना इतकी भीषण होती की तिचा व्हिडीओ आणि प्रत्यक्षदर्शींची वर्णने अंगावर शहारे आणणारी आहेत. अपघातग्रस्त विमानात एकूण २४२ प्रवासी होते, ज्यात भारतासह ब्रिटन, पोर्तुगाल आणि कॅनडा या देशांतील नागरिकांचा समावेश होता. यामध्ये दोन नवजात बालकं आणि ११ लहान मुलंही होती.

अपघातात विमान एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं, ज्यामुळे इमारतीचं मोठं नुकसान झालं असून १५ डॉक्टर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी मोठा विध्वंस झाला असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करताना एक्सवर लिहिलं आहे, अहमदाबादमध्ये घडलेली विमान दुर्घटना अतिशय वेदनादायक आहे. या घटनेने माझं मन व्यथित केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या शोकसंवेदना आहेत. जखमींना तातडीने मदत मिळावी यासाठी सर्व यंत्रणांना सूचित करण्यात आलं आहे. संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी मी सातत्याने संपर्कात आहे. या अपघातानंतर संपूर्ण देशभरातून शोकसंदेश येत असून, पीडितांच्या मदतीसाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

Advertisement
Advertisement