Published On : Sat, Jun 29th, 2019

नासुप्र’च्या अतिक्रमण कारवाईने स्थानिय नागरिकांना दिलासा

मा. पालकमंत्री यांच्या आदेशानंतर अनधिकृत सेलिब्रेशन’च्या इमारतीवर कारवाई

नागपूर: मानेवाडा स्थित लाडीकर लेआऊट नागरिक विकास समिती मधील भूखंड क्रमांक १५,१६,१७,१८ (पार्ट) या भूखंडावर बांधण्यात आलेले श्री राम सेलिब्रेशन नावाने व्यावसायिक वापर होत असलेले हॉलचे अनधिकृत बांधकाम नागपूर सुधार प्रन्यासतर्फे हटविण्यात आले. भूखंडधारकाने उक्त सभागृहाचा बांधकाम नकाशा मंजूर न करून घेतल्याने उर्वरित अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी सदर कारवाई आज शनिवार दिनांक २९ जून रोजी करण्यात आली.

Advertisement

उल्लेखनीय आहे कि, ३ जून ते ५ जून दरम्यान याठिकाणी नासुप्र’तर्फे अतिक्रमण हटविण्यात आले होते. इमारतीच्या पूर्वेकडे मंदिर असल्यामुळे या इमारतीचा काही भाग सोडण्यात आला होता. तसेच दक्षिणेकडे भूखंड क्रमांक १८च्या बाजूला राहते घर असल्यामुळे हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे इमारतीचा काही भाग सोडण्यात आला होता. इमारतीचा हा भाग श्री. लाडीकर यांना स्वतःतोडून टाकायचे होते. मात्र तसे न करता व नागपूर सुधार प्रन्यासची परवानगी न घेता श्री. लाडीकर यांनी तुटलेला भाग काढून तिथे नव्याने भिंत बांधून पुन्हा अवैध बांधकाम केले.

Advertisement

या अवैध बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांनी मा. पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केली. यावर मा. पालकमंत्री यांनी आढावा बैठकीत बांधकाम हटविण्याचे निर्देश नागपूर सुधार प्रन्यासला दिले. आदेशाचे रीतसर पालन करत नासुप्र’च्या क्षतीपथक विभागाने संपूर्ण कारवाई करून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण केले. सदर कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी नासुप्र’च्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. संजय चिमुरकर, विभागीय अधिकारी श्री. अनिल राठोड, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ श्री संदीप राऊत, क्षतिपथक प्रमुख श्री. मनोहर पाटील तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले व तब्बल ९० पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement