Published On : Sat, Jun 29th, 2019

शेतात वीज पडल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जख्मि

कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गुमथळा येथे शेतातून दूध वाहून नेताना अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बस स्थानक चा बाजूला गावातील दोन मित्र उभे असता अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने एका अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मित्र जख्मि असल्याची घटना सायंकाळी 5 च्या दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव चेतन रवींद्र पातोडे वय 17 वर्षे रा गुमथळा ता कामठी तर जख्मि तरुणाचे नाव मुकेश प्रकाश वहेकर वय 18 वर्षे रा गुमथळा असे आहे.

प्राप्त माहितीनुसार शेतातील दूध वाहून नेत असता अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसाच्या बचावातून वाचण्यासाठी गुमथळा बस स्थानक च्या बाजूला उभे असता अचानक वीज कडाडून या दोन्ही मुलांच्या अंगावर पडल्याने चेतन पातोडे चा जागीच मृत्यू झाला तर मुकेश वहेकर जख्मि झाला असता वेळीच मदतीची भावना घेत धावून आलेल्या ग्रामस्थांनी नजीकच्या गुंमथळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ हलविले असता वैद्यकीय अधिकारो डॉ शिला पाझारे यांनी चेतन ला मृत घोषित केले तर मुकेश वहेकर ला उपचारार्थ नागपूर च्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अरविंद हिंगे यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली यासंदर्भात मौदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Advertisement

संदीप कांबळे

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement