Published On : Fri, Nov 15th, 2019

रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर नासुप्रची कारवाई

नागपूर: मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती यांच्या निर्देशाप्रमाणे व मुख्य अभियंता (मुख्यालय) यांच्या नेतृत्वात शुक्रवार दिनांक १५ नवंबर २०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या दक्षिण विभागातील खसरा क्रमांक ७३, शुक्ला नगर, हावरापेठ या अभियानयासातील ९ मीटर रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण काढण्यात आले.

नासुप्रच्या रिट पिटिशन १८५८/२०१८ या न्यायालयीन प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये सदर कारवाई नासुप्रतर्फे करण्यात आली. यावेळी नासुप्रच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. एस एन चिमुरकर, विभागीय अधिकारी (दक्षिण) श्री. अनिल राठोड, सहायक अभियंता श्री. संदीप राऊत व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री. वसंत कन्हेरे तसेच अजनी पोलीस निरीक्षक श्री. हनुमंतराव उरला गोंडावार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.