Published On : Thu, Aug 29th, 2019

नागपूर, पुणे नंतर महा मेट्रो राबवणार नाशिक येथील मेट्रो प्रकल्प

Advertisement

नागपूर: राज्य सरकारने नाशिक करिता मास ट्रांजीट सिस्टम अंतर्गत मेट्रो नियोला मान्यता दिली आहे. नाशिककरांन करता ही निश्चितच अभिमानाची आणि आनंदची बाब आहे की एक अनोखा प्रकल्प त्यांच्या शहरात राबवला जाणार आहे. देशात अश्या प्रकारे राबविली जाणारी मेट्रो नियो हा पहिलाच प्रयोग आहे. केवळ 4 वर्षात नागपूर मध्ये मोठी मजल मारत पुण्यातही मेट्रो कामाच्या प्रवासात उल्लेखनीय झेप घेणाऱ्या महा मेट्रोलाच नाशिक येथे या प्रकल्पाच्य अंबलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे.

नाशिक येथे सुरक्षित विश्वसनीय आणि आरामदायी सार्वजनिक प्रवासी वाहतूकीला चालना देण्याची जबाबदारी महा मेट्रोला राज्य शासनाने नोव्हेबर 2018 ला दिली होती. तथपश्चात जानेवारी 2019 मध्ये नाशिक महानगरपालिका,सिडको, लोकप्रतिनीधी आणि इतर भागधारकांशी झालेल्या चर्चेनंतर डीपीआर तयार करण्याचे काम सुरु झाले. अहवाल तयार झाल्यावर राज्य सरकारकडे सदर डीपीआर सादर करण्यात आला आणि आज दिनांक 28 ऑगस्ट 2019 रोजी त्याला मान्यता दिली. सदर प्रस्ताव आता केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि नगर विकास विभागाकडे राज्यशासना मार्फत पाठविला जाईल.

मेट्रो नियो हा प्रकल्प अतिशय आधुनिक असून नाशिक आणि तत्सम लोकसंख्या असलेल्या शहराकरीता उपयुक्त आहे. या क्षेत्रातील तद्ध आणि इतर संबंधिताशी सविस्तर चर्चा करून मेट्रो नियोची संकल्पना सादर करण्यात आली. सर्व साधारण पणे 20 – 30 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांनकरता वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याकरता योग्य त्या उपायावर केंद्र सरकार विचार करत होती. अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर केंद्र सरकारने 21 ऑगस्ट 2019 ला महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापित केली टायर वर धावणारी जलद गती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाबंधी सर्व बाबींवर विचार करण्याकरता तसेच या बाबीत एक वाक्यता आणन्याकरता या समितीची स्थापना केली होती.

नाशिकच्या मेट्रो नियो प्रकल्पाचे ठरक वैशिष्ट्ये:
सुरुवातीला 2 कॉरीडोर बनविण्यासंबंधीची योजन आहे, पहिला कॉरिडोर गंगापूर ते मुंबई नाका असून याची लांबी 10 कि.मी आहे या अंतर्गत 10 मेट्रो स्थानके असतील. स्थानकांची नावे या प्रकारे : गंगापूर, जलापूर,गणपत नगर,काळे नगर, जेहाण सर्कल, थटे नगर, शिवाजी नगर, पंचवटी, सीबीएस आणि मुंबई नाका आहे.

दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड दरम्यान असून याची लांबी 22 कि.मी आहे या अंतर्गत 15 स्टेशन असतील. स्थानकांची नावे या प्रकारे : ध्रुव नगर, श्रामिक नगर, महिंद्र,शनेश्वर नगर, सातपूर कॉलोनी, एमआयडीसी, एबीबी सर्कल, परिजात नगर, मिको सर्कल, सीबीएस, शारदा सर्कल, द्वारका सर्कल, गायत्री नगर, समता नगर, गांधी नगर, नेहरू नगर, दत्त मंदिर, नाशिक रोड तसेच सीबीएस हे दोन्ही मेट्रो कॉरीडोर करता इंटरचेंज स्टेशन असेल.

फिडर सेवेकरता 2 कॉरिडोर असतील त्यातील पहिला कॉरिडोर : सातपूर कॉलोनी, गरवारे आणि मुंबई नाका दरम्यान तर दुसरा कॉरिडोर : नाशिक रोड, नांदूर नाका,शिवाजी नगर दरम्यान असेल.ईलेव्कट्रीक बस कोचेसची लांबी 25 x 18 मीटर असून याची प्रवासी क्षमता 200 ते 300 असेल. या बसेस रबर टायर वर चालतील आणि वरती असलेल्या ईलेव्कट्रीक क वायरच्या माध्यमाने यांना वीज पुरवठा होईल.

या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 2100 .6 कोटी असून यात राज्य शासन, सरकार आणि नाशिक महानगरपालिकायांच्या 552 .19 कोटीचा वाटा असून केंद्र सरकारचा सहभाग रु.387 .56 कोटी इतका राहील अश्याप्रकारे एकूण सरकारचा वाटा 939 .3 कोटीचा असेल तर उर्वरित 1161.3 कोटी कर्जाच्या माध्यमाने उभे केले जातील. मेट्रो नियो प्रकल्पाला मान्यता मिळण्यामागे .हेमंत गोडसे खासदार, रंजना भानसी महापौर – नाशिक, देवयानी फरादे, सिमा हेरे, बाळासाहेब सानप सर्व आमदार, डॉ. ब्रिजेश दीक्षित (व्यवस्थापकीय संचालक – (महा मेट्रो),. राधाकृषण गमे (आयुक्त नाशिक महानगरपालिका) आणि एन.के. सिन्हा कार्यकारी संचालक (महा मेट्रो) यांचा मोलाचा वाटा आहे. राज्य सरकार, गृह निर्माण आणि नगर विकास विभाग (केंद्र सरकार),सिडको, नाशिक महानगरपालिका,एमआयडीसी आणि महा मेट्रो यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही परवानगी मिळाली.

अश्या प्रकारचा अनोखा पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण वाहतूक प्रकल्प मिळणारे नाशिक हे देशातील पहिले शहर असून भारत आणि विदेशात एमआरटीएस व्यवस्था (मास ट्रांजीट सिस्टम) करता ही एक अभिमानाची बाब असल्याचे महा मेट्रो व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित या प्रसंगी म्हणाले.