Published On : Sun, Jul 1st, 2018

नरेंद्र तिडके महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Advertisement

रामटेक: नरेंद्र तिडके कला आणि वाणिज्य माहाविद्यालाय रामटेक येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग् प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पतंजली योग समिती, रामटेक, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व लोकसंख्या शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ आर यु गायकवाड हे होते. योग प्रशिक्षक म्हणून पातंजली योग समिती रामटेक चे मार्गदर्शक राजकुमार गायकवाड , सौ सीमा पाटणे,सौ वैशाली चकिनारपवार , कु स्नेहल धमगाये ,सौ वंदना गायकवाड उपस्थित होते.

पतंजली योग समितीच्या प्रशिक्षकानी विध्यार्थ्यांना व प्राध्यापकाना योगाचे जीवनातील महत्त्व सांगितले. याप्रसंगी विविध आसने व विविध व्यायामांचे प्रकार करून दाखवले .प्राध्यापक व विद्यार्थी यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा नरेश आंबिलकर यांनी केले.प्रस्तावित डॉ मनोज तेलरांधे यांनी तर आभार डॉ महेंद्र लोधी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी प्राध्यापक वर्ग ,कर्मचारी व विध्यार्थ्यांनि परिश्रम घेतले.