Published On : Mon, Mar 25th, 2019

भंडारा गोंदियामधून राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांची लढत भाजपचे सुनील मेंढे यांच्याशी होणार आहे.

Advertisement

भंडारा गोंदिया मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, या ठिकाणाहून कोणी निवडणुक लढवायची याविषयी नक्की होत नव्हते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदान असतानाही येथील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर केला जात नव्हता. अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना रविवारी रात्री नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Advertisement

नाना पटोले यांनी राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे विजयी झाले होते. असे असले तरी या ठिकाणाहून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात येईल, असे सांगितले जात होते. नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी, हे ठरत नसल्याचे शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार जाहीर होत नव्हता. अखेर मधुकर कुकडे किंवा प्रफुल्ल पटेल यांना तिकीट न देता पक्षाने नाना पंचबुद्धे यांची निवड केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement