
नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीवर वाठोडा पोलिसांनी मोठा घाव घालत नाकाबंदीदरम्यान 27.33 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. कार आणि मोबाईलसह ₹6 लाख 46 हजार 650 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
26 जुलै रोजी पहाटे गरीब नवाज चौक येथे विशेष नाकाबंदी सुरू असताना संशयास्पद टाटा पंच कार पोलिसांनी अडवली. वाहन थांबताच एक जण पळून गेला, तर कारमधील मोहम्मद उजेर शेख जावेद (20, रा. बाबा ताजनगर, खरबी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत झिपलॉक पाऊचमध्ये ठेवलेले 27.33 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले.
चौकशीत जप्त केलेले अमली पदार्थ आवेश खान (30, रा. ताजनगर, खरबी) याचे असल्याचे आरोपीने सांगितले. शहरात एमडीची विक्री करण्याच्या उद्देशाने दोघे फिरत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हेलमेट अभियान के बीच उठे नए सवाल
मानेवाड़ा दहन घाट में दिनदहाड़े खूनी झड़प, पुराने विवाद में युवक की...
मेलघाट आश्रमशाला में फिर छात्र बीमार #maharashtranews #amravati #ashramshala #bhojan #viral
जर्जर दीवार गिरने से रिक्शा चालक घायल #maharashtranews #accident #newsupdate #kalyandombivli
बालासाहेब के विचारों पर चलें: पाटिल #maharashtranews #modi #sanjayraut #bjp #shivsena
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...




