Published On : Mon, Feb 22nd, 2021

नैवेद्यम इस्टोरिया सील ८ कोरोना पाजिटिव्ह रुग्ण मिळाले

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोन कार्यालयाने कळमना रोड प्रभाग २४ येथील नैवेद्यम इस्टोरिया मंगल कार्यालयाला १० मार्च पर्यंत सील केले आहे. या मंगल कार्यालयात कोरोनाचे ८ रुग्ण मिळाले होते.

सहाय्यक आयुक्त साधना पाटील यांनी सांगितले की, या मंगल कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचा-यांची कोरोना चाचणी आदिवासी वस्तीगृहात करण्यात आली. यापैकी आठ कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह निघाले. यामध्ये स्वयंपाक काम करणा-या कर्मचा-यांचाही समावेश आहे. या परिसराला कन्टेनमेंट (विलगीकरण) क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे.

मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी कोव्हिड -१९ नियमांचे पालन न करणा-या मंगल कार्यालया विरोधात कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत चालला आहे. नागरिक मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन करतांना दिसत नाही. मनपा तर्फे मंगल कार्यालयाच्या विरोधात दररोज कारवाई करण्यात येत आहे.

नैवेद्यम सील करण्याची कारवाई सहाय्यक आयुक्त साधना पाटील यांचा मार्गदर्शनात झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी भेसारे, उप अभियंता अजय पझारे, कनिष्ठ अभियंता जगदीश बावनकुळे यांनी केली.