Published On : Mon, Feb 22nd, 2021

शिवाजी जयंती निमित्त पत्रकार सौमित्र नंदी कोरोना योद्घा ने सम्मानित

संदीप कांबळे कामठी

कामठी :-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधून छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान महा राज्य च्या वतीने कामठी नगर परिषद अध्यक्ष मो शाहजहां शफाअत अन्सारी यांच्या शुभ हस्ते कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्यची दखल घेत बेंगाली ग्रुप एन्ड एसोसिएट चे अध्यक्ष व पत्रकार सौमित्र नंदी यांना कोरोना योद्घा म्हणून छत्रपति शिवाजी महाराज यांचे तैलचित्र प्रदान करून सम्मानित करण्यात आले.

याप्रसंगी छत्रपति शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चे पदाधिकारी पंकज नलेंद्रवार, हितेश बावनकुळे, चंद्रशेखर तुप्पट, अनिल देशमुख, श्रीकांत मुरमारे, गणेश सायरे, अश्विन पारसे, अनिकेत तरारे एवं छावा मराठा संगठन के जिला अध्यक्ष नियाज़ सिंघानिया आदि गणमान्य उपस्थित होते।