Published On : Mon, Feb 22nd, 2021

२४ तासांचे शटडाऊन: पेंच १ जलशुद्धीकरण केंद्र २४ फेब्रुवारी रोजी राहणार बंद

५ झोन्सचा पाणीपुरवठा बुधवार (२४ फेब्रुवारी) रोजी राहणार बाधित

नागपूर: वॅपकॉस लिमिटेड या अमृत योजनेंतर्गत अनोंदणीकृत व स्लम वस्त्यांमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे काम करणाऱ्या कंपनीने गोधनी-गोरेवाडा ४००मिमी फीडर मेनवर आंतरजोडणीचे काम करण्यासाठी २४ तासांचे शटडाऊन घेण्याची विनंती केलेली आहे. हे शटडाऊन २४ फेब्रुवारी २०२१ (बुधवार) रोजी सकाळी १० ते २५ फेब्रुवारी सकाळी १० दरम्यान घेण्यात येईल.

दरम्यान, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी याच २४ तासांत इतरही काही महत्वाची कामे हाती घेण्याचे ठरविले आहे. यात हनुमान नगर इनलेट व आऊटलेट व्हॉल्व बदलणे आणि पेंच १ येथील इलेक्ट्रिकल यार्डात आयसोलेटर तसेच DO सेट बदलण्याचे काम, ई. कामांचा समावेश आहे.

या कामांसाठी पेंच १ गोरेवाडा २४ फेब्रुवारी २०२१ सकाळी १० ते २५ फेब्रुवारी २०२१ सकाळी १० दरम्यान बंद राहील. यामुळे गांधीबाग, मंगळवारी, धरमपेठ, धंतोली व सतरंजीपुरा या झोन्सचा पाणीपुरवठा बाधित राहील.

पेंच १ शटडाऊनमुळे खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील:
गांधीबाग झोन (मेडिकल फीडर): कोठी रोड, गाडीखाना, नवी शुक्रवारी, कर्नल बाग, रामाजीवाडी, सुभाष रोड, घाट रोड, जोहरीपुरा, चांडक लेआऊट, इंदिरा नगर, जाटतरोडी, रामबाग, इमामवाडा, रामबाग म्हाडा, मेडिकल, बारा सिग्नल, पटेल टिम्बर मार्केट, उंटखाना, राजाबाक्षा, घाट रोड

धंतोली झोन: वंजारी नगर, सोमवारी क्वार्टर, वकीलपेठ, रघुजी नगर, हनुमान नगर, सिरसपेठ, रेशीमबाग, चंदन नगर, PTS क्वार्टर, ओम नगर, शिव नगर, महावीर नगर, आनंद नगर, भागात कॉलोनी, रघुजी नगर, सुदामपुरी, जुने नंदनवन, तिरंगा चौक, नेहरू नगर, कबीर नगर, गायत्री नगर, अजनी रेल्वे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, कुकडे लेआऊट, कौशल्या नगर, बाभूळखेडा, चंद्रमणी नगर, विलास नगर, वसंत नगर

धरमपेठ झोन: : राजभवन बर्डी लाईन – बर्डी मेन रोड, टेकडी रोड, कुंभारटोली, नेताजी मार्केट, तेलीपुरा, आनंद नगर, मोदी नं. १,२,३, गणेश मंदिर, रामदासपेठ, महाराजबाग रोड,

मंगळवारी झोन: राजभवन छावणी लाईन; छावणी, राजनगर, मेकोसाबाग, बयरामजी टाऊन ख्रिश्चन कॉलोनी, विजय नगर, न्यू कॉलोनी, पागलखाना, गड्डीगोदाम, माउंट रोड, बुटी चाळ, खेमका गल्ली, तुकाराम चाळ, रेड क्रॉस रोड, सदर व सदर पोलीस लाईन भाग, नई बस्ती, सिंधी कॉलोनी, कडबी चौक, क्लार्क टाऊन, लुंबिनी नगर, गौतम नगर

गोरेवाडा GSR : नटराज सोसायटी, दर्शन सोसायटी, एकता नगर, नर्मदा सोसायटी, माधव नगर, प्रकाश नगर, उज्वल नगर, गणपती नगर, शिव नगर, काळे लेआऊट, जय दुर्गा नगर, केशव नगर, वेलकम सोसायटी, राष्ट्रसंत नगर, शबिना सोसायटी, श्रीकृष्ण नगर, आशीर्वाद नगर, सुमित नगर, गायत्री नगर, बाबा फरीद नगर, बंधू नगर, एमबी टाऊन १, २ व ३, माता नगर, झिंगाबाई टाकळी वस्ती, गीता नगर, डोये लेआऊट, आदर्श नगर, मनवर लेआऊट, साईबाबा कॉलोनी, फरस.

सतरंजीपुरा झोन: राजभवन बोरियापुरा फीडर मेन: लष्करीबाग, मोतीबाग रेल्वे क्वार्टर, मेयो हॉस्पिटल, सैफी नगर, अन्सार नगर, डोबी, कमल बाबा दर्गा, ह्न्सापुरी, भगवाघर चौक, मोमिनपुरा, MLC कँटीन भाग, शेख बारी चौक, नाल साब चौक काला झेंडा तकिया, भानखेडा, दादरापूल टिमकी, गोळीबार चौक, कोसारकर मोहल्ला, नंदबाजी डोहा, समता बुद्ध विहार, सपाटे मोहल्ला, दांदरे मोहल्ला, देवघरपुर, गंगाखेत चौक, बाजीराव गल्ली, पाचपावली रेल्वे गेट, पिली मारबत, धापोडकर गल्ली (तांडापेठ), लाल दरवाजा, मुसलमानपुरा, बंगालीपंजा, मस्कासाथ, इतवारी तेलीपुरा, मिरची बाजार चौक, भाजीमंडी, लोहाओळी, रेशम ओळी, बर्तन ओळी, बाजीराव गल्ली, तीन नळ चौक, खापरीपुरा, भिशीकर मोहल्ला, भाजी मंडी, टांगा स्टँड, संभाजी कासार, ढीवरपुरा, राम नगर, बांगलादेश, उमाटेवाडी, बैरागीपुरा, तेलीपुरा पेवठा, बारईपुरा, मिरची मंदिर भाग, इतवारी रेल्वे स्टेशन, मारवाडी चौक

शटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने मनपा-OCW ने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

NMC-OCW have appealed citizens to co-operate and if they have any complaints regarding water supply or need information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.