Published On : Sat, May 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील ‘प्रोजेक्ट डी.आर.ई.ए.एम.’ला विशेष सन्मान; इंडिया पोस्टकडून स्पेशल कव्हर प्रकाशित

Advertisement

नागपूर : ग्रामीण भागातील शिक्षण आणि डिजिटल सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या ‘प्रोजेक्ट डी.आर.ई.ए.एम.’ला आज विशेष सन्मान प्राप्त झाला. इंडिया पोस्ट आणि जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर आधारित विशेष टपाल कव्हर (स्पेशल कव्हर) प्रकाशित करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांची उपस्थिती होती.

ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘प्रोजेक्ट डी.आर.ई.ए.एम.’ची दखल घेत इंडिया पोस्टने हा गौरव केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावांमधील वापरात नसलेल्या शासकीय इमारतींचे रूपांतर अत्याधुनिक स्मार्ट ग्रंथालयांमध्ये करण्यात येत आहे.

या स्मार्ट ग्रंथालयांमध्ये संगणक, स्मार्ट टीव्ही, वाय-फाय, सीसीटीव्ही यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच विविध विषयांवरील ७०० हून अधिक पुस्तके विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी आवश्यक साधने सहज उपलब्ध होत आहेत.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यास मदत होत असून डिजिटल साक्षरतेलाही चालना मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.