नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सोमवारी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदावर मोठा प्रशासकीय बदल केला आहे. नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासन आदेशानुसार, सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असलेले विश्वास नांगरे-पाटील आता नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांची बदली एसीबीच्या अपर पोलीस महासंचालकपदी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22न अंतर्गत सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर हा आदेश जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत.
विश्वास नांगरे-पाटील हे त्यांच्या धडाडीच्या कार्यपद्धती, कडक प्रशासन आणि जनसामान्यांशी असलेल्या संवादासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे नागपूरच्या पोलीस प्रशासनात नव्या कार्यशैलीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, डॉ. रविंद्र सिंघल यांनी नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून आता ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नवी जबाबदारी सांभाळणार आहेत.
या बदलीमुळे नागपूरच्या प्रशासकीय आणि पोलीस वर्तुळात चर्चांना उधाण आले असून शहराच्या पोलीस नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे मानले जात आहे.
KYC के नाम पर ₹7.5 लाख साफ! #NagpurNews #CyberFraud #CyberCrime #OnlineFraud #KYCScam...
मालिक नहीं मिला तो कर्मचारी पर हमला! #NagpurNews #Crime #KnifeAttack #CrimeNews #MaharashtraCrime
मंगलसूत्र और सोने की मणि चोरी के दो मामले उजागर
वर्धा में ग्राम पंचायत कर्मचारियों का जिला परिषद पर मोर्चा #vidarbhanews #wardha...
नाना पटोले का अमित शाह पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha...
रत्नागिरी समुद्र तट पर पर्यटकों की कार फंसी #maharashtranews #ratnagiri #newsupdate #maharashtra





