Published On : Wed, Jun 18th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरची नशामुक्तीच्या दिशेने वाटचाल; “ऑपरेशन थंडर” मोहिमेंतर्गत 730 आरोपींना अटक

8 कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त
Advertisement

नागपूर : “एकत्र येवूया, नशामुक्त समाज घडवूया” या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरु झालेल्या “ऑपरेशन थंडर” मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, गेल्या सव्वा वर्षात तब्बल 730 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून १ मार्च २०२४ पासून राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत ८ कोटी ६५ लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

‘ड्रग्स फ्री नागपूर’साठी पोलिसांचा निर्धार-
२०२० ते २०२५ या कालावधीत अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांत गुंतलेल्या आरोपींना लक्ष्य करून, त्यांच्या घरांवर थेट झडती घेण्यात आली. काही आरोपी मृत आढळले, तर काही तुरुंगात असल्याचे स्पष्ट झाले. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तैनात करण्यात आले आहे. काहींनी आपली वस्तीही बदलल्याने शोध अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘सिंबा अ‍ॅप’मध्ये गुन्हेगारांचा संपूर्ण डेटा-
अटक आरोपींचे मोबाईल फोन्स तपासण्यात आले असून, बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजवर सखोल तपास सुरू आहे. अनेक गुन्हेगारांची फिंगरप्रिंट्स, छायाचित्रे घेऊन ती ‘सिंबा प्रणाली’ अ‍ॅपमध्ये नोंदवण्यात आली आहेत. भविष्यात अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा डेटाबेस मोलाचा ठरणार आहे.

मुद्देमालाचा डोंगर-
या कारवाईत अंमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल फोन, वाहने असा विविध प्रकारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व जब्तीची माहिती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वर्गीकृत करण्यात आली आहे. यामध्ये गुन्हे शाखा युनिट, विशेष पथक आणि स्थानिक पोलीस ठाण्यांची मोलाची साथ राहिली.

नागपूरकरांनी पोलिसांना द्यावी साथ-
पोलिस आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट केले की, “ऑपरेशन थंडर” ही केवळ पोलिसांची नव्हे तर नागपूरकरांचीही लढाई आहे. नागरिकांनी आपल्या आजूबाजूच्या संशयास्पद हालचाली, व्यक्ती किंवा अंमली पदार्थांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. नशामुक्त नागपूर घडवण्यासाठी ही सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले.

संघर्ष, साहस आणि संकल्पाची यशोगाथा-
“ऑपरेशन थंडर” हे नागपूर शहरासाठी एक टर्निंग पॉइंट ठरत आहे. हा संघर्ष केवळ पोलिसांचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. नशेच्या विळख्यातून आपल्या तरुण पिढीला बाहेर काढण्यासाठी ही धडपड सुरूच राहणार आहे.

Advertisement
Advertisement