Published On : Wed, Mar 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या कोराडी महाजेनकोत हॉट एअर पाइपलाइन लीक; गरम वाफेने ४ कर्मचारी जखमी

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील महाजेनकोच्या ६६० मेगावॅट वीज प्रकल्पात बुधवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. टर्बाइन मेंटेनन्स विभागातील हॉट एअर पाइपलाइन अचानक लीक झाल्याने बाहेर पडलेल्या गरम वाफेच्या झळा लागून चार कर्मचारी जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाइपलाइनमधून अचानक तीव्र गरम वाफ बाहेर पडू लागल्याने तेथे काम करत असलेले चार कर्मचारी त्याच्या संपर्कात आले. या घटनेत त्यांच्या हात-पायांना किरकोळ भाजल्या गेल्याची माहिती आहे.

Gold Rate
Mar 10, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,61,800/-
Gold 22 KT ₹ 1,50,500 /-
Silver/Kg ₹ 2,76,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जखमी कर्मचाऱ्यांची ओळख रविंद्र नांदुरकर (५०), विशाल कांबळे (४०, सुपरवायझर), राहुल केळकर (३५, फिटर) आणि शैलेश मेश्राम (३५) अशी करण्यात आली आहे.
अपघातानंतर महाजेनको प्रशासनाने तत्काळ सर्व जखमींना कोराडी कॉलनीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून उर्वरित दोघांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनेच्या वेळी सेक्शन इंचार्ज, सुरक्षा अधिकारी आणि अन्य कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. ६६० मेगावॅट प्रकल्पातील स्टीम व ऐश पाइपलाइनमध्ये अधूनमधून गळतीच्या तक्रारी समोर येत असल्याचेही सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा दुर्घटना टाळण्यासाठी पाइपलाइनचे नियमित ऑडिट आणि देखभाल करणे आवश्यक आहे.

दरम्यान, या घटनेची चौकशी महाजेनको प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मुख्य अभियंता विलास मोटघरे यांनी घटनेची दखल घेत जखमी कर्मचाऱ्यांच्या उपचारांना प्राधान्य देण्याचे आणि प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement