नागपूर : नागपूरच्या डॉली चायवाल्याने बनविलेल्या चहाचा आस्वाद मायक्रोसॉफ्टच्या सीईओ बिल गेट्सने घेतला. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. खुद्द बिल गेट्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तो व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.
या व्हिडीओवरून रातोरात प्रसिद्धी झोतात आलेला.डॉली चहावाला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अमूलने शेअर केलेल्या डूडलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून, अमूलच्या अधिकृत पेजवरून शेअर झालेल्या या चित्रामध्ये आपल्याला चहाची किटली, तसेच गाडीवर ठेवण्यात येणारे विविध बिस्किटांचे वगैरे डबे दिसतात. तसेच रंगीत गॉगल लावलेला डॉली आणि सुटाबुटातील बिल गेट्सचे अत्यंत सुंदर असे चित्र पाहायला मिळते. चित्रात बिल गेट्सच्या हातात चहाचा ग्लास दिसत असून, डॉलीच्या हातात ब्रेड-बटरची एक ताटली दिसत आहे.
चित्रामध्ये वरच्या बाजूला ‘चायक्रोसॉफ्ट’असा मजकूर लिहिलेला आहे.