Published On : Sat, Jun 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरचा अर्थसंकल्प विकासाला गती देणारा;स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणींची प्रतिक्रिया

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी यांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ६,२०२.४८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ‘नागपूर टुडे’शी संवाद साधताना हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आल्याचे सांगितले. नागरिकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दाणी म्हणाल्या की, यंदाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आणि कोणताही नवीन कर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून विकास आणि आर्थिक शिस्त यांचा समतोल राखण्यात आला आहे.

Gold Rate
Aug 25 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,100 /-
Gold 22 KT ₹ 1,50,400 /-
Silver/Kg ₹ 2,42,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्या म्हणाल्या की, महानगरपालिकेचा मुख्य भर नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि इतर नागरी सेवांच्या बळकटीकरणासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

यासोबतच शिक्षण क्षेत्रालाही अर्थसंकल्पात विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

दाणी यांनी सांगितले की, ६,२०२.४८ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प नागपूरच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप असून शहरातील प्रत्येक घटकाचा विचार करून तो तयार करण्यात आला आहे. विकासकामांना गती देतानाच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे, हेच महानगरपालिकेचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges