Published On : Thu, Sep 10th, 2020

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द,भेटीसाठी चाहत्यांची लागली रांग; शुक्रवारी नागपूर सोडणार

Advertisement

नागपूर:  शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली राज्य सरकारने रद्द केली आहे. केवळ १५ दिवसांतच तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यात आला असून यामागे नेमकं काय घडलं, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

(IAS Tukaram Mundhe ‘s Transfer Canceled ) तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी नुकतीच कोरोनावर (Corona) मात केली आहे. (IAS Officer Tukaram Mundhe transfer order cancelled) तुकाराम मुंढे यांची 26 ऑगस्टला मुंबईत बदली करण्यात आली होती, तर त्यांच्याकडे असलेल्या नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कारभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

तुकाराम मुंढे यांना बदलीनंतर देण्यात आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. निंबाळकर हे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.

तुकाराम मुंढे यांच्या भेटीसाठी चाहत्यांची लागली रांग;
अवघ्या सहा-सात महिन्यात बेशिस्त कर्मचारी, अधिकारी व नागरिकांवर आपल्या शिस्तीची जरब बसवणारे व अल्पावधीत लोकप्रिय झालेले नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना गुरुवारी नागपूरकरांनी भेट देऊन आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. मुंढे शुक्रवारी सकाळी मुंबईकडे रवाना होत आहेत.

नागपुरातील लॉ कॉलेज चौकात असलेल्या वसतीगृहासमोरच्या त्यांच्या निवासस्थानी दिवसभर त्यांच्या चाहत्यांनी रांगा लावून त्यांची भेट घेतली. मुंढे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचे निदान झाले होते. त्यांच्या प्रकृती रक्षणासाठी एका नागपूरकर भगिनीने नवस केला होता. ते कोरोनामुक्त झाल्याचे कळताच तिने मुंढे यांना राखी बांधून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

गुरुवारी दुपारपासूनच मुंंढे यांच्या निवासस्थानासमोर गर्दी जमू लागली होती. नागरिक आपले मनोगत व्यक्त करायला व एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या रुपात असलेल्या त्यांच्या मनातील नेत्याला भेटण्यासाठी आले होते.

नागपूरकरानी अशा शब्दात व्यक्त केल्या भावना
आपण पुन्हा नागपूरला आलात तर आम्हाला आनंद होईल.. सामान्य नागरिकांना आयुक्त कसे असतात ते तुमच्यामुळे माहित झाले.. आपण आलात आणि दुसऱ्या दिवसापासून कामाचा धडाका लावलात.. आपल्या कामाची नेहमीच आठवण राहील.. कोविड १९ च्या काळात नागपूरला तुमची गरज होती… प्रत्येक मातेला तिचा पुत्र हा तुमच्यासारखा व्हावा असंच वाटेल.. सर, तुम्ही स्वतंत्र पक्ष काढा.. आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ.. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी हवे आहात..