Published On : Thu, Sep 10th, 2020

कृषी दूताकडुन कोंबड्याचे लसीकरण

कृषी महाविद्यालय नागपूर, च्यावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत सालेमेटा येथे मार्गदर्शन

रामटेक – ‌कृषी महाविद्यालय नागपूर, च्यावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत सालेमेटा येथे महेन्द्रा पोल्ट्री फार्म ला कृषी दूत सागर कारेमोरे या विद्यार्थ्यांने कोंबड्याचे लसीकरना बाबत मार्गदर्शन केले तेव्हा कोंबड्यामध्ये मानमोडी या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास मोठया प्रमाणात मारतुक होते.ज्या कोंबड्या या आजारातून बऱ्या होतात,त्या अंडी देने बंद करतात सफल अंड्याचे प्रमाण कमी होते ,या आजाराचा प्रादुर्भाव माणसांना देशील होते कंजक्टायव्हीटीस( डोळे येणे)हा आजार होते मानमोडी या आजारावर रोगप्रतिबंधक हाच चांगला उपाय आहे कोंबड्यामधील मानमोडी या आजाराला राणीखेत किंवा न्यू कॅसल डिसीजदेखील म्हणतात.

हा आजार अतिशय संसर्गजन्य असून सर्व भागात आढळते.हा रोग लॅटोजेनिक ,मेसोजणिक आणि व्हेलोजेनिक विषाणूपासून होतो. विषाणू कोंबड्याच्या वेगवेगळ्या अवयावर परिमाण करतात .

या आजारावर कोणतेही खात्रीलायक उपचार नाहीत . आजार होऊ नये म्हणून पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली अटीबायोटीक्सचा वापर करावा .लासोटा लस 5 ते 7 दिवस वयाचा पिलांना देण्यात यावी तसेच 15 दिवसानंतर आय बी डी बुस्टर आणि 21 दिवसानंतर लासोटा बुस्टर देणात यावी असे त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.भावना वानखेडे मॅडम चे मार्गदर्शन लाभले तसेच गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.