मुंबई/नागपूर : बँकॉकहून भारतात परतलेल्या नागपूरच्या एका तरुणाला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने अटक केली आहे. त्याच्या ट्रॉली बॅगेतून तब्बल १३.४७ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ४.७१ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
अटक करण्यात आलेल्या तरुणाची ओळख विकास गणोरकर (वय ३०, रा. नागपूर) अशी झाली आहे. सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटला त्याच्याबाबत आधीच गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. विकास हा मित्रांसोबत बँकॉकला फिरण्यासाठी गेला होता. मंगळवारी रात्री तो मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान त्याच्या ट्रॉली बॅगेतून १३.४७ किलो हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. त्यानंतर सीमाशुल्क विभागाने त्याला तात्काळ ताब्यात घेत अटक केली. यावेळी त्याचा पासपोर्ट, बोर्डिंग पास, बॅगेज टॅग आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत या प्रकरणात इतर काही व्यक्तींचा सहभाग असल्याचे संकेत मिळाल्याने तपास यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी रॅकेटच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. हा प्रतिबंधित अंमली पदार्थ बँकॉकमधून कोणी पाठवला, भारतात तो कोणाकडे पोहोचवायचा होता आणि या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, आरोपीच्या वतीने अॅड. स्वराली केळकर यांनी न्यायालयात दावा केला की, विकास गणोरकर याला बॅगेत प्रतिबंधित अंमली पदार्थ असल्याची कोणतीही माहिती नव्हती आणि त्याला या प्रकरणात अडकविण्यात आले आहे. सध्या सीमाशुल्क विभाग आणि अन्य तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
स्पा की आड़ में कथित देह व्यापार का भंडाफोड़ #vidarbhanews #nagpur #newsupdate...
घुले परिवार से मिलीं पंकजा, न्याय का भरोसा #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra...
अंबादास दानवे का BJP पर बड़ा हमला #BJP #MaharashtraPolitics #Gondia #NavneetRana #MaharashtraNews
सोनम वांगचुक के समर्थन में बीड में प्रदर्शन | #SonamWangchuk #NEET #paperleak...
यवतमाल में नकली बीज बेचने वालों पर होगी FIR #Farmers #FakeSeeds #Agriculture...
खरपतवारनाशक से धान की पूरी पौध तबाह #maharashtranews #bhiwandi #newsupdate #maharashtra





