Published On : Wed, May 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात प्रेयसीला व्हिडीओ कॉल करून तरुणाची आत्महत्या

Advertisement

नागपूर : शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातील वादातून २० वर्षीय तरुणाने प्रेयसीला व्हिडीओ कॉल करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दानागंज स्वीपर कॉलनी येथे राहणारा आयुष अमर वामन हा रेल्वे स्थानकावर हाऊसकीपिंगचे काम करत होता. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याने आपल्या खोलीत छताच्या पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला.

Gold Rate
June 30,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 40,500 /-
Gold 22 KT ₹ 1,30,400 /-
Silver/Kg ₹ 2,21,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आयुषचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेपूर्वी आयुषने संबंधित तरुणीला व्हिडीओ कॉल केला आणि कॉल सुरू असतानाच टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी चौकशी केली असता संबंधित तरुणीने त्याला थांबवण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही, असेही समोर आले आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी आयुषने मोबाईलमधील काही चॅट डिलीट केल्याची बाबही तपासात उघड झाली आहे.

Advertisement

या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला असून मृत तरुणाच्या मित्रांचीही चौकशी सुरू आहे. लकडगंज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

मोबाईल डेटा, कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

Advertisement
फुटाला तालाब के पास भुट्टे को लेकर विवाद, युवक की चाकू मारकर हत्या

फुटाला तालाब के पास भुट्टे को लेकर विवाद, युवक की चाकू मारकर...

संत निवृत्तिनाथ पालखी का पंढरपुर प्रस्थान

संत निवृत्तिनाथ पालखी का पंढरपुर प्रस्थान

टीईटी पेपर लीक पर कांग्रेस का प्रदर्शन

टीईटी पेपर लीक पर कांग्रेस का प्रदर्शन

गैस टैंकर की टक्कर, एक की मौत

गैस टैंकर की टक्कर, एक की मौत

आरडी फार्म हाउस कार्रवाई पर फिलहाल रोक

आरडी फार्म हाउस कार्रवाई पर फिलहाल रोक

नागपुर में कार बेचने के नाम पर 1.90 लाख की ठगी

नागपुर में कार बेचने के नाम पर 1.90 लाख की ठगी

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges