नागपूर : शहरातील सदर परिसरातून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचा गेल्या दोन दिवसांपासून एक दुचाकीस्वार युवक पाठलाग करत होता. मात्र यावेळी महिलेच्या पतीने आरोपीला रंगेहात पकडले. घाबरलेल्या युवकाने स्वतःची दुचाकी घटनास्थळीच सोडून पळ काढला. सदर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
माहितीनुसार, ३५ वर्षीय महिला सदर परिसरातील एका बेकरीमध्ये मागील दोन महिन्यांपासून काम करत आहे. घटनेच्या दिवशी काम आटोपून ती पायी आकाशवाणी चौक बसस्थानकाकडे जात होती. त्याचवेळी एका होंडा दुचाकीवरील युवकाने तिचा पाठलाग करत बसस्थानकापर्यंत येऊन गाडी थांबवली.
दरम्यान, महिलेचे पतीही तेथे पोहोचले. त्यांनी युवकाला पकडून मागील दोन दिवसांपासून पत्नीचा पाठलाग का करत आहे, याबाबत जाब विचारला. अचानक झालेल्या चौकशीमुळे युवक घाबरला आणि स्वतःची दुचाकी घटनास्थळीच सोडून पळून गेला.
यानंतर संबंधित दुचाकी सदर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, जप्त केलेल्या दुचाकीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश जांभळे करत आहेत.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...
नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से...
हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV
नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda...
मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews





