Published On : Mon, Mar 8th, 2021

नागपुरकर महिलांनी केले जागतिक महिला दिवसाचे शंखनाद करुन स्वागत

नागपुर : नागपुरकर महिलांनी आज जागतिक महिला दिवसाचे शंखवादन करुन अपुर्व स्वागत केले… अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट वर स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला साक्षी ठेवत महिलांनी नारीशक्तीचा शंखनाद केला…यावेळी भारताच्या या लेकींनी की मातृभूमी करिता सदैव अग्रेसर राहण्याची शपथ घेतली आणि भारत मातेचा जयजयकार केला…..

नागपुरात आजपासुन महिलांच्या शंखनाद प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला….सामान्यपणे शंखवादन हा पुरुषांच्या मक्तेदारीचा प्रांत….पण महिलांनाही शंख वादनाचा अधिकार आहे…आवश्यकता आहे ती शंख वादन कसे करावे आणि शंख ध्वनी कसा काढायचा याचे तंत्र शिकण्याची…नेमके हे तंत्र महिलांना आता शिकविले जाणार आहे…याकरिता हंसाबेन पाघडाल यांनी पुढाकार घेतला आहे….केणतेही शुल्कलन आकारता महिलांना शंखवादन शिकवले जाईल, असे पाघडाल यांनी सांगितले…

हंसाबेन पाघडाल यांनी सींगितले की, शंख वादन करणे आणि शंख ध्वनी ऐकणे, दोन्हीही लाभदायक आहे…महिलाहीनशंखवादन करु शकतात….आवश्यकता आहे ती शंखवादनाचे तंत्र शिकण्याची…हे तंत्रच इच्छुक महिलांना शिकविले जाईल…पाघडाल यांनी कोरोना लॉकडाऊनचा उपयोग करुन घेत १५ महिलांना शंखवादन शिकविले….आता या १५ महिलांच्या मदतीनें नागपुरीतील किमान १०० महिलांना हे तंत्र शिकविण्याचा त्यांचा मानस आहे. आजपासुन या शंखवादन प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला…