Published On : Fri, Apr 7th, 2017

नागपूर देशातील “स्मार्ट सिटी” साठी माडेल ठरणार – महापौर


नागपूर
: स्मार्ट सिटीच्या तिस-या टप्प्यात निवड झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच नागपूर शहरात अनेक महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्यात आलेत. स्मार्ट स्ट्रीट, एसटीपी हे पथदर्शी प्रकल्प इतर शहरांसाठी जसे मार्गदर्शक ठरत आहेत. तसेच भविष्यात नागपूर शहर हे देशातील अन्य स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झालेल्या शहरासांठी “स्मार्ट माडेल” ठरेल असा आशावाद महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने इलिट्स टेक्नो मिडिया प्रा.लि च्या सहकार्याने हाटेल लि मेरिडियन येथे आयोजित दोन दिवसीय स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के. गौतम, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, बार्सिलोनाचे माजी उपमहापौर ऍन्थोनी विवस थामस, विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष अरुण लाखानी, सिस्कोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल नायर, फिलीप्स लायटिंगचे मुख्यकार्यकारी अधिकारी हर्ष चितळे, बॅंक आफ महाराष्ट्रचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एन.व्ही पुजारी, एनसीसीचे संचालक रघु अल्लोरी, इलिट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डा रवि गुप्ता उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, “स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झाल्यानंतर स्मार्ट वाहतूक, स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि स्मार्ट प्रशासनाच्या दिशेने कार्य सुरु झाले आहे. इतर शहरांच्या तुलनेत नागपूरने वेगाने कार्य सुरु केले आहे. नागपुरात होऊ घातलेले स्मार्ट ऍन्ड स्टेनेबल सिटी शिखर संमेलन हे स्मार्ट सिटी उपक्रमात मैलाचा दगड ठरणार आहे. या संमेलनाचा लाभ देशभरातील स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झालेल्या शहरांना होणार असून नागपूर शहर “स्मार्ट” करण्याच्या दृष्टीने या संमेलनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या. संमेलनाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करुन त्यांनी संमेलनात देशविदेशातून सहभागी झालेल्या प्रतिनिधींचे महापौर या नात्याने शाब्दिक स्वागत केले.

Advertisement

या प्रसंगी बोलताना बार्सिलोनाचे माजी उपमहापौर ऍन्थोनी विवस थामस म्हणाले, वायफाय, सिसीटीव्ही कॅमेरा, सेन्सार लाईट्स, रस्ते म्हणजेच स्मार्ट सिटी नसून शहरातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, तसेच विविध नागरी सुविधांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे म्हणजेच स्मार्टसिटी साकारणे होईल, हे सोदाहरण स्पष्ट केले.

विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष अरुण लखानी म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून अनेक महत्त्वाचे प्रकल्प नागपुरात आकारास येत आहे. पीपीपी मध्ये आता चौथा “पी” जोडायचा आहे आणि तो म्हणजे पब्लिकचा “पी” आणि या “चार पी” माडेलचे आपण भागीदार असल्याचा आपल्याला अभिमान आहे.

सिस्कोचे व्यवस्थापकिय संचालक अनिल नायर, फिलीप्स लाईटिंगचे सीईओ हर्ष चितळे, बॅँक आफ महाराष्ट्राचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एन.व्ही. पुजारी, एनसीसीचे संचालक रघु अल्लोरी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

राज्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के.गौतम यांनी स्मार्ट सिटीमधील डिजीटलएझेशनवर प्रकाश टाकला, तंत्रज्ञानाचा वापर स्मार्ट सिटी प्रकल्पात कशाप्रकारे केला जातोय आणि नागपूरात ते कशाप्रकारे अमलात आणले जातेय, याबाबत माहिती दिली.

प्रस्ताविक भाषणातून मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही संधी असल्याचे सांगितले. स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी शिखर परिषद म्हणजे विचारांचे आदानप्रदान आणि कल्पनांची देवाण-घेवाण करण्याच्या दृष्टीने उत्तम व्यासपीठ असल्याचे सांगितले. यात सहभाग घ्या, अनुभवांचे आदानप्रदान करा आणि आपले शहर स्मार्ट बनविण्यात महत्त्वाची भूमिका निभवा, असे सांगितले.

तत्पूर्वी महापौर नंदाताई जिचकार आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करुन संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. इलीट्स ने प्रकाशित केलेल्या नागपूर वर आधारीत इ-गव्हर्नस पुस्तकाचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मनपा आयुक्तांच्या हस्ते सर्व प्रमुख पाहुण्यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. इलीट्सचे सीईओ डा. रवी गुप्ता यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना स्मृचीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला. आभार डा. रवी नायर यांनी मानले.


प्रदर्शनीचे उद्घाटन

शिखर संमेलनाच्या औपाचरिक उद्घाटनानंतर महापौर नंदाताई जिचकार यांनी फीत कापून प्रदर्शनीच उद्घाटन केले. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात भागीदार असलेल्या विविध संस्था, बॅंका आणि कंपन्यांचे स्टाल या प्रदर्शनीत आहेत. मनपाच्यावतीने आपले सरकार, ग्रीन बस, नागनदी विकास, आरेंज सिटी स्ट्रीट चे स्टाल असून नागपूर मेट्रोची माहिती देणारेही स्टाल आहेत.

विविध विषयांवर चर्चासत्र

शिखर संमेलनात चार सभागृहात चार विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आली. इंटरनॅशनल एक्सपिरियंस आन स्मार्ट सिटीज, स्मार्ट आणि सस्टेनेबल मोबिलिटी, स्वच्छ इंडिया फार ए स्मार्टर इंडिया, इफेक्टिव्ह वेस्ट मॅनेजमेंट फार स्मार्ट सिटीज, आयटी ऍन्ड इ गर्व्हरनंस फार स्मार्ट सिटी इको सिस्टीम, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर ऍन्ड स्मार्ट हाऊसिंग फार स्मार्ट सिटीज, वाटर मॅनेजमेंट फार स्मार्टर अर्बन लोकल बाडीज हे शिखर संमेलनातील चर्चासत्राचे विषय होते. प्रत्येक विषयावर तज्ज्ञांनी त्यांचे विचार मांडले.

Advertisement
Advertisement
Advertisement