Published On : Sun, Mar 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर ट्रॅफिक अपडेट: ‘वंचित’च्या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल!

Advertisement

नागपूर : शहरात 23 मार्च 2026 (सोमवार) रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान चौक येथे आंदोलन होणार असून, त्यानंतर संविधान चौक ते मॉरिस वाय पॉईंटदरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत.

वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, दुपारी 12 ते 3 या वेळेत या मार्गावरील वाहतूक वळविण्यात येईल. त्यामुळे या परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

बदललेले मार्ग असे असतील-
-रहाटे कॉलनीकडून मॉरिस वाय पॉईंटकडे जाणाऱ्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे डावीकडे वळून पुढे मानस चौकातून उजवीकडे वळावे.
– मानस चौकातून मॉरिस वाय पॉईंटकडे जाणाऱ्यांनी रहाटे चौक येथे डावीकडे वळून पुढील मार्ग पकडावा.
– इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सकडून येणाऱ्यांनी मानस चौक गाठून तेथून उजवीकडे वळत रहाटे चौकमार्गे पुढे जावे.
– कामठी रोड किंवा कस्तुरचंद मेट्रो स्टेशनकडून आरबीआय चौकाकडे जाणाऱ्यांनी जयस्तंभ चौक येथे डावीकडे वळून पुढे आकाशवाणी चौकातून उजवीकडे वळावे.

Gold Rate
Mar 21 2026 - Time 10.22Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,200 /-
Gold 22 KT ₹ 1,35,000 /-
Silver/Kg ₹ 2,30,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागरिकांसाठी सूचना-
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, संबंधित वेळेत या मार्गांचा वापर टाळावा, वाहतूक नियंत्रणासाठी तैनात पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे.

ही माहिती पोलीस उप आयुक्त (वाहतूक) लोहित मतानी यांनी प्रसिद्धीसाठी दिली असून, नागरिकांनी प्रवासाचे नियोजन यानुसार करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement