नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेपत्ता तरुणीच्या शोधमोहीमेबाबत पोलिस अधिकाऱ्याने “गाडीमध्ये डिझेल नाही” असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण पोलिस यंत्रणेवर तीव्र टीकेची झोड उठली आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाचे सर्वप्रथम सविस्तर वृत्तांकन नागपूर टुडेने प्रसारित केल्यानंतर पोलिस मुख्यालयात हालचालींना वेग आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासकीय पातळीवर तातडीने निर्णय घेण्यात आले असून बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
दोन वरिष्ठ निरीक्षकांची तातडीने बदली
पोलिस आयुक्तालयाने जारी केलेल्या आदेशानुसार पाचपावली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबुराव नारायण राऊत यांची बदली नागपूर शहर नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. तर वाहतूक परिमंडळ, सिताबर्डी येथील पोलिस निरीक्षक अनिरुद्ध रमेश पुरी यांची पाचपावली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या घडामोडींमुळे पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून संवेदनशील प्रकरणांमध्ये तत्काळ प्रतिसाद आणि जबाबदारीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate





