Published On : Wed, May 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात विधान परिषद पोटनिवडणुकीची रणधुमाळी; 18 जूनला होणाऱ्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक जाहीर होताच जिल्ह्यात 18 मे 2026 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. रचना इंदूरकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

Gold Rate
May 14- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 159,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,000 /-
Silver/Kg ₹ 2,70,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 25 मे 2026 रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून निश्चित करण्यात आली आहे. 2 जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

या पोटनिवडणुकीसाठी 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार असून 22 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 जूनपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

मतदानासाठी सुमारे 14 मतदान केंद्रांची तयारी करण्यात येत असून प्रत्यक्ष पाहणीनंतर अंतिम यादी 20 मेच्या सायंकाळपर्यंत जाहीर केली जाणार आहे. या मतदारसंघात सध्या अंदाजे 834 मतदार असून महापालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींकडून अंतिम पडताळणी सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. आचारसंहितेबाबत कोणतीही तक्रार असल्यास संबंधितांनी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement