नागपूर: शहरातील प्रसिद्ध शासकीय उद्यान असलेल्या तेलनखेडी गार्डन येथे १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी कॉकटेल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.प्रशासनाकडून अद्याप अंतिम परवानगी मिळालेली नसतानाही मोठ्या गाजावाजा करत आयोजकांनी शहरात कॉकटेल महोत्सवाचे होर्डिंग्ज लावले आहेत.
तेलनखेडीसारख्या सरकारी उद्यानात दारूशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न ‘नागपूर टुडे’च्या टीमने उपस्थित केला. एवढेच नाही तर त्याची तिकिटे सोशल मीडिया आणि ऑनलाइनवरही विकली जात आहेत.याबाबत आम्ही पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. अखेर ‘नागपूर टुडे’च्या खास वृत्ताचा इम्पॅक्ट पडला असून शेवटी प्रशासनाला जाग आली आहे. टीएसएस कॉकटेल महोत्सव आता नवीन ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. दिवस आणि वेळ एकच असून हा महोत्सव तेलंगखेडी गार्डनऐवजी खसरा ५४, द्रुगधामना, नागपूर येथील ‘हाफ टाइम’ याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
तत्पूर्वी तेलनखेडीसारख्या सरकारी उद्यानात दारूशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल नागपूर टुडे च्या टीमने उपस्थित केला. या संदर्भात ‘नागपूर टुडे’च्या प्रतिनिधीने नागपूर पोलिस विभागाशी संपर्क साधला असता, डीसीपी झोन २ च्या राहुल मदने यांनी याबाबत भाष्य केले होते.डीसीपी मदने म्हणाले होते की, तेलनखेडी येथे कॉकटेल महोत्सवासाठी आयोजकांनी परवानगी अर्ज केला आहे, जो आम्ही माननीय पोलिस आयुक्त (सीपी) रविंद्र सिंगल यांना पाठवला होता.तेच यावर अंतिम निर्णय घेतील. दुसरीकडे, उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी सांगितले होते की, आयोजकांनीही विभागाकडे अर्ज केले आहेत. या संदर्भात, कार्यक्रमस्थळाच्या व्यवस्थापकांकडून एनओसी मिळाल्यानंतरच परवानगी दिली जाईल. या संदर्भात लेखी आक्षेप नोंदवल्यास परवानगी देण्याच्या प्रश्नाची चौकशी केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की तेलनखेडी गार्डन हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येते, जे एक सरकारी संस्था आहे. हे पाहता सरकारच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आयोजकांनी हे पाऊल कोणाच्या प्रेरणेने उचलले होते? असा प्रश्न अद्यापही उपस्थित करण्यात येत आहे