Published On : Sat, Jan 18th, 2020

महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा क्रिकेट,व्हॉलीबॉल मध्ये नागपूर संघ अंतिम फेरीत

गुलाबसिंग वासावे आणि प्रिया पाटीलचे मैदानी स्पर्धेत यश

नागपूर: येथे सुरु असलेल्या महावितरण अंतर परिमंडल क्रीडा स्पर्धेत तिसऱ्या दिवशी धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या गुलाबसिंग वासावेने २०० आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवला. क्रिकेट, व्हॉलीबॉल स्पर्धेत यजमान नागपूरच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या दिनांक १९ जानेवारी रोजी राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Gold Rate
26 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,400 /-
Gold 22 KT ₹ 1,06,400 /-
Silver/Kg ₹ 1,38,100/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेतील उपांत्य सामन्यात यजमान नागपूर आणि कोल्हापूर संघाने अंतिम फेरी गाठली. नागपूरने नांदेडचा तर कोल्हापूरने औरंगाबादचा पराभव केला. नागपूरने नांदेडचा २५-१७, २६-२४ या गुण फरकाने पराभव केला. नागपूरकडून पियुष गोसेवडे, अमित शेंडे, प्रकाश चिनालोरे तर नांदेड संघाकडून सय्यद हमीद, पवन सूर्यवंशी यांचा खेळ उत्कृष्ट झाला. औरंगाबादने कोल्हापूरचा २५-८, २५-१२ या गुण फरकाने पराभव केला. कोल्हापूरकडून उमेश माने, समीर अली शेख, राकेश गांगोडे यांचा तर औरंगाबाद संघाकडून परमेश्वर जाधव, असिफ सय्यद यांचा खेळ चांगला झाला. क्रिकेट स्पर्धेत उपांत्य सामन्यात नागपूरने मुंबई मुख्य कार्यालयाचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

खो-खो महिला गटात औरंगाबाद संघाने यजमान नागपूरचा ५-४ या गुण फरकाने पराभव केला. औरंगाबादच्या सोनी बरेलाने नागपूर संघाचे ३ खेळाडू बाद करून आपल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. पराभूत नागपूर संघाकडून स्मिता जांगडेने १ खेळाडू बाद केला.

मैदानी स्पर्धेत पुणे संघाच्या गुलाबसिंग वसावेने २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. महिला गटात मुख्य कार्यालय मुंबईच्या प्रिया पाटील पाटीलने पहिला क्रमांक पटकवला. गुलाबसिंग वसावेने २०० मीटर आणि ४०० मीटर अनुक्रमे २५. ०४ सेकंद आणि ५८. १३ सेकंदात पूर्ण केले. २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कोल्हापूरच्या प्रदीप वंजारीने दुसरा क्रमांक पटकावला. त्याने हे अंतर २५. ९७ सेकंदात पूर्ण केले.

महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या प्रिया पाटीलने हे अंतर ३३. २५ सेकंदात पूर्ण केले. दुसरा क्रमांक नागपूरच्या सरिता सरोटेने पटकावला. तिने हे अंतर ३५. १९ सेकंदात पूर्ण केले. महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत नागपूरच्या श्वेतांबरी आंबाडेने पहिला क्रमांक पटकावला. तिने हे अंतर १ मिनिट . २५ सेकंदात पूर्ण केले. दुसरा क्रमांक पुण्याच्या अर्चना भोंगेने पटकावला. तिने हे अंतर १ मिनिट . २८ सेकंदात पूर्ण केले. पुरुषांच्या ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुण्याच्या प्रतीक वायकरने पहिला क्रमांक पटकवला. महिला गटात मुख्य कार्यालयाच्या प्रिया पाटीलने पहिला क्रमांक पटकावला.

कब्बडी स्पर्धेत पुरुष गटात झालेल्या सामन्यात भांडुप आणि कोल्हापूर संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. भांडुप संघाने कल्याणचा ३० विरुद्ध १० गुण फरकाने पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान नागपूर संघाला कोल्हापूरकडून पराभूत व्हावे लागले. कोल्हापूरने नागपूरचा २६ विरुद्ध ११ गुण फरकाने पराभव केला. ब्रिज स्पर्धेत पेअर प्रोगेसिव्ह गटात नागपूर संघाने पहिला क्रमांक पटकवला. तर लातूर संघाने उपविजेतेपद पटकावले. नागपूर संघात पंकज आखाडे. महेश मेश्राम यांचा समावेश होता. सांघिक गटात मुख्य कार्यालय मुंबईने पहिला तर लातूर संघाने दुसरा क्रमांक पटकवला.

कॅरम स्पर्धेत पुरुष एकल गटात नागपूरच्या अंकित भैसारे, मुख्य कार्यालय मुंबईचे विजय सावंत, अनंत गायत्री, पुण्याच्या संजय कांबळे यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. 19 जानेवारी 2020 ला दुपारी 4 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्याच मैदानावर राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. नितीन राऊत यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री दिलीप घुगल राहणार आहेत.

Advertisement
Advertisement