
नागपूर : नागपुरातील कपीलनगर परिसरात अवघ्या चहाच्या पैशावरून झालेल्या किरकोळ वादाने भीषण वळण घेतले. चहाच्या टपरीवर झालेल्या वादातून टपरीचालकाने ग्राहकाच्या गळ्यावर चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कपीलनगर पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.
ही घटना 12 जुलै रोजी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान मौजा नारी, उप्पलवाडी-कामठी रोडवरील सहारे पेट्रोल पंपाजवळील चहाच्या टपरीवर घडली. मनोज विश्वनाथ यादव (वय 45, रा. संजीवनी आवास योजना, दर्शन कॉलनी, नंदनवन) हे चहा पिण्यासाठी टपरीवर गेले होते. चहाच्या पैशावरून त्यांचा टपरीचालक कैलास लालचंद्र गणविर (वय 44, रा. अशोक सम्राट नगर, कपीलनगर) याच्याशी वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या आरोपीने दुकानातील चाकू उचलून मनोज यादव यांच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या यादव यांना परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांनी तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी मृताच्या पत्नी रजनी मनोज यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपीलनगर पोलिसांनी आरोपी कैलास गणविर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ईंट भरने के विवाद में मजदूर की हत्या ...#maharashtranews #nagpurnews #news #vidarbha
रवि राणा का उद्धव ठाकरे पर बड़ा हमला #MaharashtraPolitics #RaviRana #UddhavThackeray #ShivSena
अमरावती को मिले नए नगर आयुक्त | #MaharashtraNews #MunicipalCorporation #MunicipalCommissioner #news
अनियंत्रित बोलेरो पिकअप आयुक्त आवास की दीवार से टकराई | #RoadAccident #MaharashtraNews...
कामठा चौक पर गांजा तस्कर गिरफ्तार ...#maharashtranews #news #updatenews #crimenews #vidarbha
अशोक खरात मामले में महिला आयोग सख्त #MaharashtraNews #NCW #VijayaRahatkar #AshokKharat #CrimeNews




