Published On : Sat, Jul 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नागपुरात जल्लोष; संविधान चौकात विद्यार्थ्यांचा ढोल-ताशांच्या गजरात विजय उत्सव

Advertisement


नागपूर : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नागपुरात कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. संविधान चौकात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि CJPचे कार्यकर्ते एकत्र जमले. ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करत आणि घोषणाबाजी करत त्यांनी हा क्षण साजरा केला.

NEET परीक्षा अनियमितता आणि शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून देशभर आंदोलन सुरू होते. “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. अखेर प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर नागपुरातील आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

संविधान चौकात जमलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. ढोल-ताशांच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला, तर अनेकांनी हातात फलक घेऊन “विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय” आणि “लोकशाहीचा विजय” अशा घोषणा दिल्या.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

CJPच्या पदाधिकाऱ्यांनी हा विजय विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा परिणाम असल्याचे सांगितले. देशभरातील विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला, असा दावा त्यांनी केला.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढील राजकीय घडामोडींवर देशाचे लक्ष लागले असून, आंदोलनकर्त्यांनी मात्र हा दिवस “विद्यार्थी शक्तीच्या विजयाचा दिवस” म्हणून साजरा केला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.